संक्षिप्त-सावंतवाडीत 15 ला वारकरी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-सावंतवाडीत 15 ला वारकरी मेळावा
संक्षिप्त-सावंतवाडीत 15 ला वारकरी मेळावा

संक्षिप्त-सावंतवाडीत 15 ला वारकरी मेळावा

sakal_logo
By

संक्षिप्त

सावंतवाडीत १५ ला वारकरी मेळावा
कणकवली ः दरवर्षी होणारा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वार्षिक जिल्हा मेळाव्याचे यजमानपद यावर्षी सावंतवाडी तालुक्याला देण्यात आले आहे. त्यानुसार हा मेळावा रविवार २५ डिसेंबरला सावंतवाडी येथील धनश्री मंगल कार्यालयात होणार आहे. सावंतवाडी येथे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र कदम, सचिव राजू राणे, जिल्हा सदस्य विलास राणे, बबन सावंत, एस. के. सावंत, प्रकाश राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष लक्षण कडव, मधुकर कडव, विष्णू राऊळ, प्रदीप सावरवाडकर, लक्षण सावंत, दशरथ ओटवणेकर, नाना सरमळकर, बाबू सावंत, रमेश सावंत, प्रकाश पाष्टे, सुरेश तावडे, बाबू नाईक, रघुनाथ आमुलेकर आदींसह सावंतवाडी, दोडामार्ग येथील वारकरी उपस्थित होते.

एसटी-मोटार धडकेत वाहनांचे नुकसान
कणकवली ः मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एसटी बस येथील बसस्थानकात जाण्यासाठी एका बाजूचा सर्व्हिसरोड सोडून उड्डाणपुलाखालून दुसर्‍या बाजूच्या सर्व्हिसरोडवर आली. त्याचवेळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या जीपची सर्व्हिस रोडवर आलेल्या बसच्या डाव्या बाजूला धडक बसली. काल (ता. ४) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात वाहनांचे नुकसान झाले. अपघाताबाबत बसचालक पुरुषोत्तम शेटये यांनी कणकवली पोलिस ठाण्यात खबर दिली; मात्र याविषयी सायंकाळी उशिरापर्यंत दोन्हीपैकी कोणत्याही वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

निरवडे उद्या भूतनाथ जत्रोत्सव
सावंतवाडी ः निरवडे येथील श्री देव भूतनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी (ता. ७) साजरा होत आहे. त्यानिमित्त सकाळी अभिषेक तसेच दुपारी उत्सवमूर्ती पालखी मिरवणूक, सायंकाळी ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री उशिरा कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

उभादांडात उद्या दत्तजयंती उत्सव
वेंगुर्ले ः उभादांडा-सिद्धेश्वरवाडी येथील प. पू. आई नरसुले समाधी मंदिरात उद्या (ता. ७) दत्तजयंती उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त पहाटे काकड आरती, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री भजन होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक मोहनदास नरसुले यांनी केले आहे.