
रत्नागिरी-क्राईम
rat०५४७. txt
(पान ३ साठी)
नाणीज अपघातातील कार चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर नाणीज-इरमलवाडी येथील वळणावर ट्रक आणि मोटारीच्या अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. मोटाचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रांत हरिश्चंद्र वारंग (रा. साखरपा, रत्नागिरी) असे संशयित कारचालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २) दुपारी एकच्या सुमारास इरमलवाडी रस्त्यावरील वळणावर घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात सुवर्णा शिवराम नागवेकर (वय ७५, रा. वाडावेसराड, ता. संगमेश्वर) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ट्रकचालक मंजुनाथ पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
विषारी द्रव्य प्राशनाने तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी ः राजापूर तालुक्यातील विखारी गेठणे येथील आंबाबागेत विषारी द्रव्य प्राशन करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. पुरण कुलसिंग थापा (वय २१, रा. विखारी गोठणे, ता. राजापूर मुळ ः उत्तराखंड) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेची नोंद राजापूर पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरण थापा हा विखारी गोठणेतील आंबाबागेत राखणीचे काम करत होता. ३ डिसेंबरला रात्री थापा यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.