
लांजा ः लांजातील सरपंचपदाचा एक अर्ज अवैध
लांजातील सरपंचपदाचा एक अर्ज अवैध
छाननी ; १९ पदासाठी ५४ अर्ज वैध
लांजा, ता. ५ ः तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यपदासाठी आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी सरपंचपदासाठीचा एक अर्ज सोमवारी (ता. ५) डिसेंबरला झालेल्या छाननीमध्ये अवैध ठरला. त्यामुळे आता सरपंचपदाच्या १९ पदांसाठी ५४ तर सदस्यपदाच्या एकूण १०७ जागांसाठी २२० नामनिर्देशनपत्र वैध ठरली आहेत.
लांजा तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या १८ डिसेंबरला होत आहेत. निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये वेरवली बुद्रुक, तळवडे, कुरचुंब, सालपे, आरगाव, कोंडगे, वाकेड, बेनीबुद्रुक, खावडी, वाघ्रट, आगवे, रुण, भडे, खानवली, कोट, कुर्णे, पुनस, निवसर आणि वेरळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सोमवारी छाननी झाली. यामध्ये १९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी प्राप्त झालेले ५५ उमेदवारी अर्जांपैकी पुनस सरपंचपदासाठी आलेला एक उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आणि १०७ सदस्यपदांसाठी प्राप्त झालेले २२० नामनिर्देशन पत्र हे सर्वच्या सर्व वैध ठरवण्यात आले.