
मालवण धान्य, केरोसीन संघटना अध्यक्षपदी गावडे
swt529.jpg
66806
अमित गावडे
मालवण धान्य, केरोसीन
संघटना अध्यक्षपदी गावडे
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ५ः तालुका धान्य व केरोसीन संघटनेच्या अध्यक्षपदी रेवंडी सर्जेकोटचे रेशन दुकानदार अमित गावडे यांची निवड करण्यात आली.
तालुक्यातील रेशन दुकानदारांची महत्त्वपूर्ण सभा ओझर या ठिकाणी आज झाली. या सभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा धान्य व केरोसीन दुकानदार संघटना सल्लागार कमलाकांत (बाळू) कुबल, अजित भोगले, भाई मांजरेकर, नंदकुमार सावंत, योगेश जाधव, सुरेश बागवे, विलास धुरी, दीपक बागवे, अमित गावडे, बबन परब, दादा मांजरेकर, विशाल ढोलम, प्रशांत मलये, विजय पेडणेकर, सुभाष गिरकर, बाबु लुडबे, द्वारकानाथ पालव, रोहीत पेडणेकर, पोईप सोसायटी चेअरमन विठ्ठल नाईक यांच्यासह असंख्य धान्य व केरोसीन दुकानदार उपस्थित होते. यावेळी निवडण्यात आलेली उर्वरित कार्यकारिणी अशी- उपाध्यक्ष- बाळकृष्ण लुडबे (तारकर्ली- देवबाग), सचिव- सुभाष गिरकर (कट्टा), खजिनदार-विजय पेडणेकर (धुरीवाडा) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.