
अत्याचारप्रकरणी पोलिस कोठडी
अत्याचारप्रकरणी पोलिस कोठडी
सावंतवाडी, ता. ५ः अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित अनुराग मधुकर परब (वय २१, रा. कारीवडे) याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले. तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मातृत्व लादल्याप्रकरणी त्याला अटक केली होती. हा प्रकार प्रेमसंबंधातून घडला होता. संबंधित मुलगी ही तीन महिन्याची गर्भवती आहे. त्यामुळे तिची तब्येत खालावल्याने ती डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली होती. यावेळी तपासणीनंतर हा प्रकार उघड झाला होता. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसार संबंधित मुलीच्या नातेवाईकांना येथील पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार संबंधित युवकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.