रत्नागिरी ः एसटीची महाकार्गो सेवा सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः एसटीची महाकार्गो सेवा सुसाट
रत्नागिरी ः एसटीची महाकार्गो सेवा सुसाट

रत्नागिरी ः एसटीची महाकार्गो सेवा सुसाट

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat५p२५.jpg - KOP२२L६६७०७महाकार्गो
--------
महाकार्गो सेवा एसटीला सावरतेय तोट्यातून

८ महिन्यात अर्धा कोटी उत्पन्न ; पन्नास गाड्या ट्रकमध्ये रूपांतरित
रत्नागिरी, ता. ५ ः कोरोना काळात टाळेबंदीमुळे बंद असलेल्या प्रवासी वाहतुकीवर एसटीची महाकार्गो ही सेवा रामबाण उपाय ठरली आहे. प्रवासी वाहतूक बंद झाल्यानंतर उत्पन्न मिळवण्यासाठी जुन्या गाड्यांचे मालवाहतूक ट्रकमध्ये रूपांतर करण्यात आले. जिल्ह्यात आंबा वाहतुकीने माल वाहतुकीला प्रारंभ झाला. कमी दर व नियमित सेवेमुळे एसटीची मालवाहतूक सेवा सुसाट असून ८ महिन्यात राज्यात मालवाहतूक करून ५० लाख ६९ हजाराचे उत्पन्न मिळाले. एसटीला तोट्यातून सावरण्यासाठी महाकार्गोचा चांगला पर्याय निर्माण झाला आहे.
कोरोनामुळे ठप्प झालेली एसटीची सार्वजनिक वाहतूक एसटीला आणखी तोट्याच्या खाईत घेऊन गेली. त्यातून सावरता सावरता नाकीनऊ आले होते. त्यावर उपाय म्हणुन एसटीच्या जुन्या गाड्यांमधुन मालवाहतूकीचा निर्णय घेतला. गेल्या वर्षीच्या आंबा हंगामात ही वाहतूक सुरू करण्यात आली. मुंबई, पुणेसह राज्याच्या कानाकोप-यात आंबापेट्या पोचवण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरली. कमी दरात ही सेवा मिळत असल्याने त्याचा फायदा अनेक व्यावसायिकांनी घेतला. त्यामुळे एसटीची ही महाकार्गोसेवा अधिक चर्चेत आली. कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे, बोरिवली, बार्शी, अकलूज, गडहिंग्लज, लातूर, चाळीसगाव, नाशिक, अंबेजोगाई, जालना, मलकापूर, कुरुंदवाड, वर्धा या ठिकाणी मालवाहतूक सुरू आहे. एसटीच्या ५० गाड्यांचे रूपांतर ट्रकमध्ये केले असून त्यातून ही मालवाहतुक केली जाते. आंबापेट्यांसह सिमेंट, मीठ, रोपे, शाडू माती, सिंटेक्स टाक्या, साखर, तांदूळ, बेसन, खत, कापड वाहतुकीला प्राधान्य दिले जाते. जांभा दगड वाहतुकीसाठीही एसटीच्या ट्रकला मागणी आहे. गेल्या आठ महिन्यात महाकार्गोच्या माध्यमातून एसटीला ५० लाख ६९ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.
--------------
कोट
आगारस्तरावर मालवाहतुकीसाठी एसटीने स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे. एसटीच्या माल वाहतूक कक्षातर्फे एमआयडीसी, कारखानदार, लघुउद्योजक, कृषिजन्य वस्तूंचे व्यापारी यांच्या भेटीगाठी घेऊन एसटीच्या मालवाहतुकीबाबत माहिती दिली जात आहे. माफक दर, नियमित व सुरक्षित सेवा यामुळे मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
- अनिल मेहतर, विभागीय वाहतूक अधिकारी, रत्नागिरी

मालवाहतुकीतून मिळालेले उत्पन्न
एप्रिल - २,६७,५१४
मे - १४,४५,८०५
जून - १०,९३,२३४
जुलै - ५,८५,७९३
ऑगस्ट - ४,५३,७८०
सप्टेंबर - ५,८२३४६
ऑक्टोबर- ५,२२,००३
नोव्हेंबर - १,१८,५४०
---------------------------
एकूण - ५०, ६९, ०१५