
कणकवलीत सरपंचपदाचे ४, तर सदस्यासाठीचे १७ अर्ज अवैध
कणकवलीत सरपंचपदाचे ४, तर
सदस्यासाठीचे १७ अर्ज अवैध
छाननी पुर्णः शिडवणे, वायंगणी, करूळ बिनविरोध सरपंच
सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. ५ः ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी आज येथील तहसीलदार कार्यालयात झाली. तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी २२४ पैकी तीन ग्रामपंचातीच्या ४ उमेदवाराचे तर १८८ प्रभागातील ११०१ सदस्या पैकी १७ अर्ज आजच्या छाननीत अवैध ठरले आहेत. तालुक्यातील शिडवणे, वायंगणी, करूळ येथे प्रत्येकी एकच अर्ज राहील्याने या गावातील सरपंचपद बिनविरोध झाले आहे.
आज झालेल्या छाननीतर प्रथम सरपंचपदाच्या अर्जामध्ये हळवल येथे चार पैकी एक अर्ज, साकेडी ५ पैकी २ आणि करूळ २ पैकी १ अर्ज अवैध ठरला आहे. तसेच सदस्य पदासाठी असलदे, बिडवाडी, फोंडाघाट, घोणसरी, करंजे, कुंभवडे, माईण, नांदगाव, वाघेरी आणि वारगाव या गावातील प्रत्येकी एक सदस्याच्या अर्ज अवैध ठरला आहे. ओझरम येथे २ सदस्यांचे अर्ज तर साकेडी येथे ५ सदस्याचे अर्ज अवैध ठरले असल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार रमेश पवार यांनी आज सायंकाळी दिली आहे. आता वैध ठरलेले अर्ज ७ डिसेंबरला माघारी घेतल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.