रत्नागिरी-काळबादेवीत समुद्री कासवाला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-काळबादेवीत समुद्री कासवाला जीवदान
रत्नागिरी-काळबादेवीत समुद्री कासवाला जीवदान

रत्नागिरी-काळबादेवीत समुद्री कासवाला जीवदान

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat५p३४.jpg- KOP२२L६६७३९ रत्नागिरी ः जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवाला जीवदान देताना मच्छीमार.
-------------
काळबादेवीत समुद्री कासवाला जीवदान
रत्नागिरी, ता. ५ ः समुद्रात मासेमारी करताना जाळ्यात सापडलेल्या कासवाला रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील स्थानिक मच्छीमार तरुणांनी जीवदान दिले. त्यासाठी मच्छीमारांना जाळंही फाडावे लागले. काळबादेवीतील तरुण संदेश मयेकर, रुपेश मयेकर, मनोज बिर्जे हे शनिवारी (ता. ३) मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. मासे पकडण्यसाठी जाळे समुद्रात सोडले होते. मासे पकडल्यानंतर जाळे ओढण्यात आले. माशांबरोबर जाळ्यात समुद्री कासव अडकलेले होते. सुमारे ४० ते ५० किलो वजनाच्या या कासवाची सुटका करण्यासाठी नौकेवरील मच्छीमार तरुणांनी जाळे तोडले. नुकसान सहन करत कासवाला त्या जाळ्यातून सोडवण्यात आले. ते मच्छीमारांनी कासव पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. या सर्व घटनेचे चित्रीकरण या तरुणांनी केले आहे. पूर्वी देखील या तरुणांनी मासेमारी जाळ्यात सापडलेल्या कासवांना पुन्हा समुद्रात सोडले होते. नुकसान सहन करून प्राण्यांना जीवदान देणार्‍यांना वन विभागाकडून आर्थिक मदत दिली जाते.