संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat०६३१.txt

(टुडे पान चार साठी, संक्षिप्त)

जागतिक मृदादिनी मातीपरीक्षणाची माहिती

दाभोळ ः विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय, दापोलीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक मृदादिनाचे औचित्य साधून दापोली तालुक्यातील कादिवली गावात कृषिकन्या व कृषिरत्न अशा दोन गटाने जागतिक मृदादिनी नागरिकांना मातीपरीक्षणाची माहिती दिली. त्याचे प्रात्यक्षिक दाखवले, फायदे सांगितले. गांडूळ खत बनवणे आणि त्याचा उपयोग कसा करावा, त्याचे फायदे या विषयीदेखील माहिती दिली. जीवामृत पंचगव्य, सेंद्रिय खताबाबत माहिती दिली. या वेळी ४० ते ५० शेतकरी उपस्थित होते.


फोटो ओळी
-rat६p१५.jpg ः

६६९०२
गुहागर ः पेवे खरेकोंड येथील कृषी शिबिरात उपस्थित शेतकरी व प्रशासकीय अधिकारी.

पेवे खरेकोंड शाळेत कृषी शिबिर

गुहागर ः पेवे खरेकोंड जिल्हा परिषद शाळेत शेतकरी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. जागतिक मृदा दिनानिमित्त ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांनी राबवला. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, विविध शासकीय योजना, काळीमिरीची शेती, शेतीवर पडणारे रोग व त्यांचे नियंत्रण या विषयी माहिती देण्यात आली. शिबिरस्थानी कृषीविषयक अवजारे आणि विविध योजनांची माहिती देणाऱ्या फलकांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी भरवले होते. शेतकऱ्यांना गांडूळ खताचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले. शिबिराला तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर, गवारी, अमित शेळके, पेवेच्या सरपंच भारती सावरटकर, मुख्याध्यापिका दाभोळकर उपस्थित होते.

फोटो ओळी
-rat६p२०.jpg-
६६९२८
दापोली ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना विद्यार्थिनी.

धानकोली शाळेत महापरिनिर्वाण दिन

गावतळे ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दापोली तालुक्यातील धानकोली शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी कादिवलीचे केंद्र प्रमुख धनंजय शिरसाट उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रम प्रसंगी भाषणे करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक राकेश महाडिक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.