कनेडी हायस्कूलचे शनिवारी स्नेहसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कनेडी हायस्कूलचे 
शनिवारी स्नेहसंमेलन
कनेडी हायस्कूलचे शनिवारी स्नेहसंमेलन

कनेडी हायस्कूलचे शनिवारी स्नेहसंमेलन

sakal_logo
By

कनेडी हायस्कूलचे
शनिवारी स्नेहसंमेलन
कनेडी, ता. ७ ः येथील माध्यमिक विद्यामंदिर कनेडी तसेच मोहनराव मुरारराव सावंत कनिष्ठ महाविद्यालय व तुकाराम सावंत सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाचा संयुक्त स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शनिवारी (ता.१०) सायंकाळी आयोजित केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचाही कार्यक्रम होणार आहे. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम शनिवारी दहा डिसेंबरला सायंकाळी साडेसहाला संस्थेच्या प्रांगणात होणार आहे. या वेळी राष्ट्रपती पदक विजेते असिस्टंट इन्स्पेक्टर संजय साटम, तसेच ठाणे येथील पोलिस उपनिरीक्षक राष्ट्रपती पदक विजेते थॉमस डिसोजा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडेसहाला कार्यक्रमाचे उद्‍घाटन होणार असून यावेळी ग्रंथ प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन आणि हस्तलिखितचे उद्‍घाटन होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव होईल. कार्यक्रमाच्या अखेरीस सायंकाळी साडेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या संयुक्त स्नेहसंमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य तथा मुख्याध्यापक सुमंत दळवी यांनी केले आहे.