
संत शिरमणी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी पवार
संत शिरमणी संघटनेच्या
जिल्हाध्यक्षपदी पवार
कुडाळ, ता. ७ ः संत शिरोमणी सामाजिक बहुउद्देशीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी तुळशीदास पवार, तर सचिवपदी बी. बी. चव्हाण यांची निवड बहुसंख्य समाजबांधवांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. संस्थापक प्रमुख बाबल नांदोसकर यांनी ही माहिती दिली.
यावेळी बाबल पावसकर यांनी समाजबांधवांतर्फे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. नांदोसकर म्हणाले, ‘‘ज्या समाजात आपला जन्म झाला, त्या समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते; पण काही कारणांनी ती इच्छा राहून जाते. यासाठी जीवाभावाचे हितचिंतक, नातेवाईक, मित्रमंडळी व समविचारी समाजबांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. समाजबांधवांचा विश्वास संपादित करण्यासाठी सर्व समावेशक विचारसरणी संपादित करून निर्णय घेणे, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे हा मुख्य उद्देश आहे. शासकीय योजना, महिला सबलीकरण, मुलांच्या शैक्षणिक समस्या, शेती उद्योग, व्यवसाय, गटई कारागीर समस्या, नोकरवर्ग समस्यांसाठी प्रयत्न करणे, समाज बांधवात कोणतेही गटतट न बघता समाजबांधव हीच संघटना मानून त्यांच्या सुख-दुःखात सहकार्याच्या भावनेने सहभागी होणे, हा दृष्टीकोन आहे.’’