विद्युत खांब धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत खांब
धोकादायक
विद्युत खांब धोकादायक

विद्युत खांब धोकादायक

sakal_logo
By

67112
सावंतवाडी ः धोकादायक विद्युत खांब.

विद्युत खांब
धोकादायक
सावंतवाडी ः शहरातील वक्रतुंड लॉजसमोरील व संचयनीमधील न्यू सेलिब्रेशन रेस्टॉरंटच्या बाजूला असलेला मुख्य विद्युत वाहिनीचा विद्युत खांब खालून पूर्णपणे जीर्ण झाला आहे. हा खांब कधीही पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित वीज वितरण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खांबाची तत्काळ पाहणी करून तो लवकरात लवकर बदलावा, जेणेकरून पुढे होणारा अनर्थ टळू शकेल, अशी मागणी ''सामाजिक बांधिलकी'' संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
--
नेरूरला शनिवारी
हरिनाम सप्ताह
कुडाळ ः एमआयडीसी नेरूर गोंधयाळे (सुके तळे) येथील श्री देव ब्राह्मणाचा दीड दिवसांचा हरिनाम सप्ताह सोहळा १० व ११ ला होणार आहे. यानिमित्त १० ला सकाळी साडेआठला श्री गणेश पूजन, कलश पूजन व अखंड नामस्मरण, साडेदहाला वेतोरे येथील भाऊ नाईक यांचे गायन, सायंकाळी चारला प्रशांत धोंड यांचे कीर्तन, सातला अनघा गोगटे, वेंगुर्ले व शेखर पणशीकर आरवली यांचे गायन, रात्री साडेआठला ग्रामस्थांची भजने, दहाला ट्रिकसीनयुक्त आकर्षक दिंड्या, ११ ला पहाटे साडेतीनला महापुरुष भजन मंडळ देवबागचे भजन व काकड आरती, सकाळी आठला अखंड नामस्मरण, गाऱ्हाणी व नवस होईल.
-----------------
कुडाळात १८ ला
वधू-वर मेळावा
कुडाळ ः जिल्हा मराठा समाज बांधव संघटनेतर्फे येथील बॅ. नाथ पै विद्यालयात १८ ला वधू-वर सूचक मेळावा होणार आहे. जिल्हा महिला अध्यक्षा प्रा. नीलम धुरी यांच्या अध्यक्षतेखाली माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल. कार्यक्रमामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योगक्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलेल्या व समाजासाठी योगदान दिलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
--
वेंगुर्ले आगारातर्फे
अष्टविनायक यात्रा
वेंगुर्ले ः वेंगुर्ले आगारातर्फे अष्टविनायक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. ९) अष्टविनायक यात्रेसाठी वेंगुर्ले आगारातून गाडी निघणार आहे. यात्रेत तीन रात्री आणि चार दिवसांचा प्रवास आहे. माहितीसाठी नीलेश वारंग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.