भाषिक शाळा वाचण्यासाठी मातृभाषेतूनच शिक्षण व्हावे भाषिक शाळा वाचण्यासाठी मातृभाषेतूनच शिक्षण व्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाषिक शाळा वाचण्यासाठी
मातृभाषेतूनच शिक्षण व्हावे 
भाषिक शाळा वाचण्यासाठी
मातृभाषेतूनच शिक्षण व्हावे
भाषिक शाळा वाचण्यासाठी मातृभाषेतूनच शिक्षण व्हावे भाषिक शाळा वाचण्यासाठी मातृभाषेतूनच शिक्षण व्हावे

भाषिक शाळा वाचण्यासाठी मातृभाषेतूनच शिक्षण व्हावे भाषिक शाळा वाचण्यासाठी मातृभाषेतूनच शिक्षण व्हावे

sakal_logo
By

67124
दिलदार चौगुले

भाषिक शाळा वाचण्यासाठी
मातृभाषेतूनच शिक्षण व्हावे

दिलदार चौगुले ः इंग्रजीचा आग्रह का?

देवगड, ता. ७ ः मातृभाषेतील शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. मातृभाषेचा अभिमान राखल्यास शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती संख्या कमी होऊन शाळा बंदची समस्या थांबेल, असा विश्‍वास गिर्ये (ता. देवगड) येथील सामाजिक कार्यकर्ते दिलदार चौगुले यांनी व्यक्त केला. गावागावांतील भाषिक शाळा वाचवायच्या असतील तर मराठी, ऊर्दू आणि इतर माध्यमिक शाळांना प्रोत्साहन दिल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.
बदलती शिक्षण पद्धती आणि पालकांचा असलेला इंग्रजी तसेच खासगी शाळांकडील ओढा यामुळे ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या कमी होत आहे. त्यामुळे चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपले मत व्यक्त केले. त्यांच्या मते, ‘‘सध्या पालकांच्या डोक्यात इंग्रजीचे वेड आहे. इंग्रजी शिकल्याशिवाय नोकरी मिळत नाही, असे विचार नेहमीच सतावत असतात. सध्या सुशिक्षित बेकारी वाढली आहे; परंतु नोकरीच्या शोधात वय निघून जाते. राज्याच्या कामकाजात बहुतांशी मराठी लिखाण तसेच वाचणे आदीचा समावेश असतो. मग सर्वांनीच इंग्रजी माध्यमातून शिकून भवितव्य काय? यासाठी आपली भाषिक संस्कृती जपली पाहिजे. सध्याचे संगणकाचे युग असले तरी कार्यालयात मराठीतच लिखाण होते. कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे पालकांनी मातृभाषेचे भान ठेवून होणारी शाळा बंदची गळती थांबवणे काळाची गरज आहे, असे आवाहनही चौगुले यांनी केले आहे.