संथ गतीच्या कामांवर व्यापाऱ्यांची नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संथ गतीच्या कामांवर व्यापाऱ्यांची नाराजी
संथ गतीच्या कामांवर व्यापाऱ्यांची नाराजी

संथ गतीच्या कामांवर व्यापाऱ्यांची नाराजी

sakal_logo
By

rat०७९.txt

(टुडे पान १ साठीमेन)
(टीप- या बातमीशेजारी २ नंबरची बातमी घ्यावी.)

फोटो ओळी
-Rat७p१०.jpg ः
६७१००
म्हाप्रळ ः आंबेत पुलाच्या पिलर कामाची पाहणी करताना शहर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी.


म्हाप्रळ-आंबेत पूल--लोगो

जलसमाधीच्या निर्णयावर व्यापारी ठाम
संथ गतीच्या कामावर नाराजी, १० डिसेंबरपर्यंत वाट पाहणार
सकाळ वृत्तसेवाः
मंडणगड, ता. ७ः म्हाप्रळ-आंबेत नादुस्त पुलाच्या पिलरच्या कामाला सुरवात झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मंडणगड शहर व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व व्यापारी सदस्यांनी म्हाप्रळ-आंबेत पुलास भेट देत जागेवर प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेतला. या वेळी वरिष्ठ शाखा अभियंता उलागडे यांच्याकडे दूरध्वनीवरून संपर्क साधून कामाची सद्यःस्थिती जाणून घेत संथ गतीने सुरू असलेल्या कामावर नाराजी व्यक्त करत कामाची वर्कऑर्डर तातडीने व्हावी, अशी मागणी केली.
या पुलावरील वाहतूक बंद असल्याने गेल्या दोन वर्षापासून शहरातील व्यापार ठप्प आहे. अनेकांवर कर्जबाजारीची वेळ आली आहे. शहरातील पन्नास टक्यांहून अधिक व्यापार रहदारीअभावी ठप्प झाल्याने शहर व्यापारी संघटनेच्यावतीने पुलाच्या कामासाठी मोठे जनआंदोलन उभे करण्यात आले आहे. या संदर्भात प्रशासनास वेळोवेळी लेखी सूचना देण्यात आल्या व आंदोलनाची भूमिका घेण्यात आली; मात्र प्रशासनाची गाडी चर्चेच्या पलीकडे सरकलेली नसल्याने ११ डिसेंबरला या पुलावरून जलसमाधी घेण्याचा निर्वाणीचा इशारा शहर व्यापारी संघटनेच्यावतीने प्रशासकीय यंत्रणाना देण्यात आला आहे. प्रशासनाकडून त्वरित काम मार्गी लावण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यातच गेल्या आठवड्यात पिलरचे पाण्याखालील कामासाठी टेस्टिंग सुरू झाल्याने सार्वजनिक बांधकामाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे कामाची वर्कऑर्डर झाली आहे का? ठेकेदार कोण? कामाची गती काय आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी शहर व्यापारी संघटनेच्यावतीने पाठपुरावा सुरू आहे. व्यापाऱ्यांनी केलेल्या म्हाप्रळ व आंबेत या गावांच्या दौऱ्याची कारणे व पुढील भूमिकाही या दौऱ्यानंतर पत्रकारांकडे स्पष्ट करण्यात आली. यात पुलाच्या कामाचे वर्कऑर्डर अद्याप झाली नसल्याने व तोंडी आदेशाने ठेकेदार कंपनीने सुरू केलेले काम संथगतीने सुरू असल्याने शहर व्यापारी संघटनेच्यावतीने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
याचबरोबर १० डिसेंबर अखेर कामाची वर्कऑर्डर न झाल्यास पुलावरून पाण्यात उड्या टाकून जलसमाधी घेण्याच्या आंदोलनाच्या भूमिकेचा पुन्नर्रोचार या दौऱ्यात करण्यात आल्याने प्रशासन यावर कोणत्या उपाययोजना करणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. पुलाच्या पाहणीसाठी व्यापाऱ्यांनी केलेल्या दौऱ्यात शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काटकर, श्रीपाद कोकाटे, नीलेश गोवळे, सचिव कौस्तुभ जोशी, दीपक घोसाळकर, राजेश पारेख, प्रवीण जाधव, आनंद नारकर, यांच्यासह शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
शुक्रवारी वर्कऑर्डर निघण्याची शक्यता
शुक्रवारी (ता. ९) मंत्रालयातून कामाची वर्कऑर्डर निघणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी सूचित केले असले तरी कामास जागेवर मशिनरी येऊन प्रत्यक्षात सुरवात होत नाही, तोपर्यंत शहर व्यापारी संघटना आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे शहर व्यापारी संघटनेने जाहीर केले आहे.