दुभत्या गायीचा वाघाकडून फडशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुभत्या गायीचा वाघाकडून फडशा
दुभत्या गायीचा वाघाकडून फडशा

दुभत्या गायीचा वाघाकडून फडशा

sakal_logo
By

तळेरेत दुभत्या गायीचा
वाघाने पाडला फडशा
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ७ : कणकवली तालुक्यातील तळेरे-वाघाचीवाडी येथील नीलेश पवार यांच्या दुधत्या गाईचा वाघाने फडशा पाडला. सोमवारी (ता. ५) सकाळी ही घटना घडली. यात पवार यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत वन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
तळेरे-वाघाचीवाडी येथील पवार या शेतकऱ्याची माळरानावर सोडलेल्या गायीला वाघाने मारले. त्याची माहिती वन विभागाला देण्यात आली; मात्र सुशेगाद असलेल्या वन विभागाचे कर्मचारी सायंकाळी उशिरा घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. जनावरांची शिकार करून वाघ मोकाट फिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून ग्रामस्थांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. वाघाकडून माणसाची शिकार झाल्यानंतरच वन विभाग जागे होणार का? असा सवाल येथील राजू वळंजू यांनी केला आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.