साकेडी सरपंचपदी साटम बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साकेडी सरपंचपदी साटम बिनविरोध
साकेडी सरपंचपदी साटम बिनविरोध

साकेडी सरपंचपदी साटम बिनविरोध

sakal_logo
By

67151
कणकवली : साकेडी गावात बिनविरोध ठरलेले सरपंच सुरेश साटम आणि इतर पाच बिनविरोध सदस्यांचे आमदार नीतेश राणे यांनी अभिनंदन केले.

साकेडी सरपंचपदी साटम बिनविरोध

इतर पाच सदस्यही बिनविरोध : एक जागा रिक्‍त तर एका जागेसाठी दुरंगी लढत

कणकवली, ता.७ : साकेडीच्या (ता.कणकवली) सरपंचपदी भाजप पक्ष पुरस्कृत सुरेश साटम यांची बिनविरोध निवड झाली. तर यापूर्वी छाननी दरम्यान चार सदस्य बिनविरोध झाले होते. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ४ नामनिर्देशन पत्र मागे घेण्यात आली. त्यामुळे आता प्रभाग एकमधून मोहम्मद जहूर शेख, सुविधा सुहास गुरव, प्रभाग दोनमध्ये प्रज्वल पांडुरंग वर्दम, विशाखा विश्वास राणे या बिनविरोध झाल्या. तर प्रभाग तीनमध्ये सर्वसाधारण जागेवर दिगंबर विजय वालावलकर हे बिनविरोध झाले. सर्वसाधारण महिला या जागेसाठी दोन्ही अर्ज मागे घेण्यात आल्याने एक जागा रिक्त राहिली आहे. तर अनुसूचित जाती महिला या जागेसाठी मंगला विजिन जाधव व प्रेरणा प्रशांत जाधव यांच्यात लढत होणार आहे. नवनिर्वाचित सरपंच व सर्वच सदस्यांचे आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन केले आहे.