रत्नागिरी-सरपंचपदाचे सहा, तर सदस्यपदाचे 16 अर्ज अवैध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-सरपंचपदाचे सहा, तर सदस्यपदाचे 16 अर्ज अवैध
रत्नागिरी-सरपंचपदाचे सहा, तर सदस्यपदाचे 16 अर्ज अवैध

रत्नागिरी-सरपंचपदाचे सहा, तर सदस्यपदाचे 16 अर्ज अवैध

sakal_logo
By

सरपंचपदाचे सहा, तर
सदस्यपदाचे १६ अर्ज अवैध
ग्रामपंचायत निवडणूकः आज चित्र होणार स्पष्ट
रत्नागिरी, ता. ७ः जिल्ह्यात होणाऱ्या २२२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाली. त्यात सरपंचपदाचे सहा तर सदस्यपदाचे १६ असे एकूण २२ अर्ज अवैध ठरले आहेत. वैध ठरलेल्या अर्जांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बुधवारपर्यंत (ता. ७) मुदत आहे. त्यानंतर राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका १८ डिसेंबरला होत आहेत. या निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांच्या अर्जांची सोमवारी छाननी झाली. यामध्ये सरपंचपदासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांपैकी चिपळूण व संगमेश्वरमध्ये प्रत्येकी दोन तर रत्नागिरी व लांजामध्ये प्रत्येकी एक अर्ज बाद ठरला. तर सदस्यपदाचे जिल्ह्यात १६ अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये दापोली १, चिपळूण २, रत्नागिरी ७ तर राजापूरमध्ये ६ अर्ज बाद ठरले आहेत.
मंडणगड सरपंचपदासाठी ४४ तर सदस्यपदासाठी १९३, दापोलीत सरपंचपदासाठी ८५ तर सदस्यासाठी ३०५, खेडमध्ये सरपंचासाठी ३४ तर सदस्यासाठी १२४, चिपळूणमध्ये सरपंच ६८ तर सदस्यासाठी ३०१, गुहागरात ५१ सरपंचपदासाठी तर २५२ सदस्यपदासाठी, संगमेश्वरमध्ये सरपंचपदासाठी ११३ तर सदस्यासाठी ४०२, रत्नागिरीत सरपंचपदासाठी ८५ तर सदस्यपदासाठी ४२२, लांजात सरपंचासाठी ५४ तर सदस्यासाठी २२० व राजापूरमध्ये सरपंचपदासाठी १०३ तर सदस्यपदासाठी ३८७ अर्ज वैध ठरले आहेत. या उमेदवारी अर्ज करणाऱ्यांना बुधवारी दुपारी ३ वाजेपयर्र्त अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले किती उमेदवार माघार घेतात, कोणकोणाशी हातमिळवणी करणार याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. काही ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोध असताना सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे तर काही ठिकाणी सरपंच, सदस्य बिनविरोध करताना एकाद्या जागेसाठीही निवडणूक होत असल्याने, अशा ग्रामपंचायतींकडेही राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.