रत्नागिरी ः ध्वजदिन निधी संकलनाचे काम सामाजिक बांधिलकीचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः ध्वजदिन निधी संकलनाचे काम सामाजिक बांधिलकीचे
रत्नागिरी ः ध्वजदिन निधी संकलनाचे काम सामाजिक बांधिलकीचे

रत्नागिरी ः ध्वजदिन निधी संकलनाचे काम सामाजिक बांधिलकीचे

sakal_logo
By

rat७p१५.jpg-
६७१७२
रत्नागिरीः जिल्हाधिकारी देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी प्रथम निधी देऊन ध्वजदिन निधी संकलनाचा आरंभ केला.
------------------
ध्वजदिन निधी संकलन ही सामाजिक बांधिलकी
जिल्हाधिकारी देवेंदर सिंह; जिल्ह्यात ३,८२२ माजी सैनिक
रत्नागिरी, ता. ७ ः सैनिकांप्रती आपली बांधिलकी जपत ध्वजदिन संकलन उद्दिष्टापर्यंत मर्यादित न राहता त्यापलीकडे जाऊन नागरिकांनी यास सहकार्य करावे आणि आपली संवेदनशीलता दाखवून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.
ध्वजदिन निधी संकलनाचा बुधवारी जिल्ह्यात आरंभ करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात वीरमाता, वीरपत्नी आणि शौर्यपदक विजेत्यांचा सन्मानही करण्यात आला. या कार्यक्रमात पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीकांत गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात ३ हजार ८२२ माजी सैनिक असून, ३ हजार ९१ शहीद पत्नी आहेत. सैनिक कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेले उद्दिष्ट ७९ टक्केच पूर्ण झाले. तरी यापुढे त्यात सामाजिक वाटा वाढेल आणि ६७ लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करून १ कोटीचे उद्दिष्ट गाठू, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या आरंभी शहिदांचे स्मरण करण्यात आले. २ मिनिटांचे मौन ठेवून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ध्वजदिन निधी स्टिकर लावून जिल्हाधिकारी सिंह यांनी प्रथम निधी संकलनास आरंभ केला. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी माजी सैनिक आणि इतरांनीही येथे निधी संकलनास मदत केली.
पोलिसदलास जे उद्दिष्ट प्राप्त होईल त्याच्या २०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करू, असे पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले. मुदतपूर्व उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या तहसीलदार लांजा यांना प्रथम पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आला तसेच इतर विजेत्यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.