Wed, Feb 8, 2023

कुडाळात १८ ला वधू-वर मेळावा
कुडाळात १८ ला वधू-वर मेळावा
Published on : 7 December 2022, 1:31 am
कुडाळात १८ ला वधू-वर मेळावा
कुडाळ ः जिल्हा मराठा समाज बांधव संघटनेतर्फे येथील बॅ. नाथ पै विद्यालयात १८ ला वधू-वर सूचक मेळावा होणार आहे. जिल्हा महिला अध्यक्षा प्रा. नीलम धुरी यांच्या अध्यक्षतेखाली माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होईल. कार्यक्रमामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योगक्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलेल्या व समाजासाठी योगदान दिलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.