
सोनाळीतील वृद्धाची गळफासाने आत्महत्या
67243
पांडुरग गोसावी
सोनाळीतील वृद्धाची
गळफासाने आत्महत्या
वैभववाडी, ता. ७ ः सोनाळी-वाणीवाडी येथील पांडुरग भिकाजी गोसावी (वय ७०) या वृद्धाने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज एकच्या सुमारास ही घटना घडली.
सोनाळी-वाणीवाडी येथील गोसावी हे आपली मुलगी, जावई आणि नातवासह राहत होते. त्यांच्या पत्नीचे चार महिन्यांपुर्वीच निधन झाले होते. पत्नीच्या निधनाचा त्यांना मोठा धक्का बसला होता. तेंव्हापासून ते निराश होते. आज दुपारी घरात कुणीही नसल्याचे पाहून त्यांनी पत्नीच्या साडीच्या सहाय्याने लोखंडी बाराला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारनंतर घरात आलेली मुलगी त्यांना गळफास स्थितीत पाहून ती कोलमडून गेली. तिच्या रडण्याच्या आवाजाने आजुबाजुला असलेले शेजारी तेथे आले. त्यानंतर ही माहिती पोलिसपाटांलांनी पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि नातू असा परिवार आहे.