सुकळवाड ठाकरे गटाचे नरेंद्र पाताडे भाजपमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुकळवाड ठाकरे गटाचे
नरेंद्र पाताडे भाजपमध्ये
सुकळवाड ठाकरे गटाचे नरेंद्र पाताडे भाजपमध्ये

सुकळवाड ठाकरे गटाचे नरेंद्र पाताडे भाजपमध्ये

sakal_logo
By

67252
सुकळवाड ः येथील ठाकरे गटाचे ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पाताडे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

सुकळवाड ठाकरे गटाचे
नरेंद्र पाताडे भाजपमध्ये
मालवण ः सुकळवाड (ता.मालवण) ग्रामपंचायतीत शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पाताडे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते तथा माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले. येथील भाजप कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. श्री. पाताडे मागील दोन टर्म ग्रामपंचायत सदस्य आहेत. भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, सुकळवाड विभागीय अध्यक्ष चेतन मुसळे, सौरभ ताम्हणकर, निशय पालेकर, संतोष गावकर, दीपक सुर्वे, बाबल मांजरेकर आदी उपस्थित होते.
----
67158
अणसूर-पाल ः येथील वायरमन प्रशिक्षण वर्गाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

अणसूर-पाल वायरमन प्रशिक्षण
वेंगुर्ले ः अणसूर-पाल विकास मंडळ, मुंबई आणि जनशिक्षण संस्थान, ओरोस सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने अणसूर-पाल हायस्कूल येथे सहाय्यक वायरमन प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ झाला आहे. याचे उद्‌घाटन नुकतेच माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर यांच्या हस्ते झाले. तीन महिने हा प्रशिक्षण वर्ग चालणार असून यात गजानन गावडे व सचिन परब हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचमध्ये २५ जण सहभागी झाले आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकारचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. भविष्यात अशा प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देणारे वर्ग संस्थेमध्ये कायमस्वरुपी सुरु करणार असल्याचा मानस संस्था सचिव लिलाधर गावडे यांनी व्यक्त केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आत्माराम गावडे, शालेय समिती चेअरमन एम. जी. मातोंडकर, सदस्य देऊ गावडे, दत्ताराम गावडे, दीपक गावडे, मुख्याध्यापिका शैलजा वेटे व सचिन परुळकर उपस्थित होते.
--
67148
धर्मराज महाराजांची उद्या जयंती
कणकवली : धर्मराज महाराज यांचा १०४ वा जयंती सोहळा शुक्रवारी (ता. ९) कणकवलीतील बालगोपाळ हनुमान मंदिरात होणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी सकाळी समाधीपूजन, लघुरुद्र, दुपारी आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी विविध मंडळांची भजने, रात्री दीपोत्‍सव आणि आरती असे कार्यक्रम होणार आहेत. या जयंती सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बालगोपाळ हनुमान मंदिर, कांबळेगल्ली, कणकवली यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
--
कुडाळात १८ ला वधू-वर मेळावा
कुडाळ ः जिल्हा मराठा समाज बांधव संघटनेतर्फे येथील बॅ. नाथ पै विद्यालयात १८ ला वधू-वर सूचक मेळावा होणार आहे. जिल्हा महिला अध्यक्षा प्रा. नीलम धुरी यांच्या अध्यक्षतेखाली माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल. कार्यक्रमामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योगक्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलेल्या व समाजासाठी योगदान दिलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.