
आंबेगावातील एकाची गळफासाने आत्महत्या
आंबेगावातील एकाची
गळफासाने आत्महत्या
सावंतवाडी, ता. ७ ः आंबेगाव-धनगरवाडी येथील पुंडलिक धाकू वरक (वय ४८) यांनी घरापासून जवळच असलेल्या काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी तीनला उघडकीस आली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वरक हे गेली काही दिवसांपासून मानसिक नैराश्यात होते. त्यात त्यांनी मद्यप्राशन करीत घरापासून जवळच असलेल्या धनगरवाडी येथील २०० मीटर अंतरावर असलेल्या काजूच्या झाडाला दुपारी दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत पोलिस ठाण्यात माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलिस महेश जाधव, पोलिस भागवत यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्या ठिकाणचा पंचनामा करीत पुढील प्रिक्रियेसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. पुतण्या कृष्णा जानू वरक याने दिलेल्या खबरवरून पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस भागवत करीत आहेत.