
अणसूर-पालला वायरमन प्रशिक्षण
६७१५८
अणसूर-पाल ः येथील वायरमन प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
अणसूर-पालला वायरमन प्रशिक्षण
वेंगुर्ले ः अणसूर-पाल विकास मंडळ, मुंबई आणि जनशिक्षण संस्थान, ओरोस सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने अणसूर-पाल हायस्कूल येथे सहाय्यक वायरमन प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ झाला आहे. याचे उद्घाटन नुकतेच माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर यांच्या हस्ते झाले. तीन महिने हा प्रशिक्षण वर्ग चालणार असून यात गजानन गावडे व सचिन परब हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचमध्ये २५ जण सहभागी झाले आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकारचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. भविष्यात अशा प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देणारे वर्ग संस्थेमध्ये कायमस्वरुपी सुरु करणार असल्याचा मानस संस्था सचिव लिलाधर गावडे यांनी व्यक्त केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आत्माराम गावडे, शालेय समिती चेअरमन एम. जी. मातोंडकर, सदस्य देऊ गावडे, दत्ताराम गावडे, दीपक गावडे, मुख्याध्यापिका शैलजा वेटे व सचिन परुळकर उपस्थित होते.
--
६७१४८
धर्मराज महाराजांची उद्या जयंती
कणकवली : धर्मराज महाराज यांचा १०४ वा जयंती सोहळा शुक्रवारी (ता. ९) कणकवलीतील बालगोपाळ हनुमान मंदिरात होणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी सकाळी समाधीपूजन, लघुरुद्र, दुपारी आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी विविध मंडळांची भजने, रात्री दीपोत्सव आणि आरती असे कार्यक्रम होणार आहेत. या जयंती सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बालगोपाळ हनुमान मंदिर, कांबळेगल्ली, कणकवली यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
--