
फोंडाघाट येथे श्रमदानातून रस्ता
67515
फोंडाघाट ः येथील महाविद्यालयाच्या मुलांनी रस्ता दुरुस्तीसाठी सहभाग घेतला.
फोंडाघाट येथे श्रमदानातून रस्ता
फोंडाघाट,ता.९ ः कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या राष्ट्रीय छात्र सेना विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी नुकताच श्रमदानातून ५०० मीटर लांबीचा रस्ता तयार केला.
गडगेसकल येथे दरवर्षी यात्रेनिमित्त हजारोच्या संख्येने भाविक येत असतात. कारण ही यात्रा पंचक्रोशीतील महत्त्वपुर्ण मानली जाते; परंतु भाविकांना मंदिरापर्यंत येण्या-जाण्यासाठी रस्त्याची सुविधा नसल्यामुळे मंदिरापर्यंत वाहने जाऊ शकत नव्हती. यात्रेकरूसाठी रस्त्याची सोय करुन देण्यासाठी हा रस्ता तयार करण्यासाठी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी तसेच गडगेसकल गावातील नागरीकांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. या उपक्रमास प्राचार्य डॉ. विष्णु फुलझेले यांनी प्रोत्साहन दिले. तर या श्रमदानाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी लेफ्टनंट डॉ. राज ताडेराव व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी. सी. कॅडेट व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयसेवक यांनी परिश्रम घेतले.