सावंतवाडी येथे २४ ला कथाकथन स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी येथे २४ ला
कथाकथन स्पर्धेचे आयोजन
सावंतवाडी येथे २४ ला कथाकथन स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी येथे २४ ला कथाकथन स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

सावंतवाडी येथे २४ ला
कथाकथन स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी, ता. ९ ः प्रतिवर्षीप्रमाणे प. पू. साने गुरुजी जयंतीनिमित्त २४ ला श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भवन सावंतवाडी यांनी (कै.) दत्ताराम वाडकर शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे.
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी दिवंगत नेते दत्ताराम वाडकर यांनी श्रीराम वाचन मंदिराकडे कायमस्वरूपी ठेवलेल्या ठेव रकमेच्या व्याजातून दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे २७ वे वर्ष आहे. स्पर्धेचे स्वरूप व अटी ः गट पहिला पाचवी ते सातवी पारितोषिक-प्रथम क्रमांक २०१, द्वितीय १५१ व तृतीय १०१ रुपये आहे. गट दुसरा आठवी ते दहावी पारितोषिक-प्रथम २५१, द्वितीय २०१ व तृतीय १५१ रूपये, असे राहील. स्पर्धा सावंतवाडी तालुक्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित आहे. जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग घेता येईल. ही स्पर्धा २४ ला सकाळी दहाला श्रीराम वाचन मंदिरात होईल. या स्पर्धेसाठी कोणत्याही संस्कारक्षम कथेची निवड करावी. स्पर्धकाला पाच मिनिटे वेळ दिला जाईल. स्पर्धा आटोपल्यावर त्या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ होईल. प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटातून दोन स्पर्धक विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. स्पर्धकांची नावे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदरपर्यंत स्वीकारली जातील. स्पर्धेक विद्यार्थी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडीचे कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.