
ग्रंथालय कर्मचारी वेतनश्रेणीसाठी प्रयत्न
67481
कुडाळ ः तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना मंगेश मसके. शेजारी प्रतिभा पाटणकर, विठ्ठल पाटणकर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
ग्रंथालय कर्मचारी वेतनश्रेणीसाठी प्रयत्न
मसके ः कुडाळ वाचनालयात कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः (कै.) सौ. विजया वामन पाटणकर वाचनालय कुडाळ व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडली. सकाळी १० वाजता वाचक स्पर्धा वाचनालयात पार पडली. दरम्यान, ग्रंथालय कर्मचारी वेतनश्रेणी व अनुदान प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करू, असे कोकण विभाग ग्रंथालय संघ अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ कार्यवाह मंगेश मसके यांनी सांगितले.
कार्यशाळेचे उद्घाटन श्री. मसके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रम व वाचनालय अध्यक्ष प्रतिभा पाटणकर, प्रमुख मार्गदर्शक जयंती कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य विठ्ठल पाटणकर, संघाचे सदस्य भरत गावडे, विठ्ठल कदम, जयेंद्र तळेकर, सतीश गावडे, दीक्षा परब उपस्थित होत्या. यावेळी मंगेश मसके यांनी सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी वेतनश्रेणी व अनुदान प्राप्त होण्यासाठी कोकण विभाग ग्रंथालय संघाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले. प्रमुख मार्गदर्शक कुलकर्णी यांनी ग्रंथालयाच्या लेखापरीक्षण संबंधी अडचणी समजून घेऊन त्यावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी तालुक्यातील विविध ग्रंथालयांचे संस्था ग्रंथालय प्रतिनिधी तसेच पाटणकर वाचनालय ग्रंथपाल प्रसाद जाधव, लिपिक श्रीमती अस्मि कुडाळकर, बापू सावंत आदी उपस्थित होते. वाचनालय कार्य सदस्य डॉ. दिपाली काजरेकर यांनी प्रस्ताविक केले. राजन पांचाळ यांनी सूत्रसंचालन केले. वाचनालय कार्यवाह विजय नाईक यांनी आभार मानले.