तुझा माझ्यावर भरोसा नाय काय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुझा माझ्यावर भरोसा नाय काय
तुझा माझ्यावर भरोसा नाय काय

तुझा माझ्यावर भरोसा नाय काय

sakal_logo
By

rat०९१४. txt

बातमी क्र.. १४ (टुडे पान ३ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-ra९p१.jpg ः

67487
रत्नागिरी ः कुणबी कर्मचारी सेवा संघाच्या तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
------
(लोगो-राज्यनाट्य स्पर्धा )

तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?मधून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन

विनाशकारी प्रकल्पावर भाष्य ः कुणबी कर्मचारी सेवा संघाचा यशस्वी प्रयत्न

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ः कोकणात अनेक प्रकल्प येतात काही चांगले तर विनाशकारीही असतात. या प्रकल्पामुळे कोकणात ग्रामीण जीवन, गावचा विकास, निसर्गसौंदर्य आणि शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेले प्रश्न, राजकारण, समाजकारण याचा वेध घेणारे नाटक ''तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?'' ही संहिता सचिन शितप यांच्या लेखनातून उतरली आहे. प्रदीप रेवाळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा प्रयोग कुणबी कर्मचारी सेवासंघ, रत्नागिरीने गुरुवारी (ता. ८) राज्य नाट्यस्पर्धेत केला. नेपथ्य, पार्श्वसंगीत साजेसे झाले. विनाशकारी प्रकल्प, रूढी, परंपरा आणि विकासाच्या नावाखाली खोत आणि सरपंच यांचा हव्यास हा नाटकाचा विषय थेट रसिकांच्या काळजात घुसला. बोलीभाषेतील गावरान ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारे नाटक पाहायला मिळाले.

काय आहे नाटक ?

कोकणात काही वर्षापासून अनेक प्रकल्प येत आहेत. त्यात काही चांगले तर काही विनाशकारी आहेत. या प्रकल्पामुळे निर्माण झालेले ग्रामीण जीवनातील प्रश्न आणि त्यातून निर्माण होणारे राजकारण, समाजकारण यांचे वेध नाटकात घेणारी कथा ''तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?'' या नाटकातून घेण्यात आली आहे. गावात प्रकल्प आला आहे यासाठी शिक्षित चाकरमानी सुरेश गावात येतो; मात्र अशिक्षित ग्रामस्थांना प्रकल्प गावात आल्याचे माहित नसते. गावात पिढ्यानपिढ्या आपले अस्तित्व वर्चस्व अबाधित ठेवून असलेल्या खोतमंडळींनी हुशारीने गोरगरिबांना अंधारात ठेवून शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमोल भावाने खरेदी चालवली होती. त्यासाठी सुरेश गावात आलेला असतो. याच कालावधीत ग्रामस्थ तात्या मुलीचे लग्न जमीन विकून करणार असतात. मुलगी सुमन हिला हे पटत नसते. ती लग्नाला नकार देते व माझं एका मुलावर प्रेम आहे, असे सांगते. या रागातून तात्या सुमनला घरातून हाकलून देतात. एकाकी जीवन जगतात. सुमन-सुरेशला भेटते. लग्न करण्याचे सांगते; पण तो नकार देतो. समाजकारणाच्या अग्नीकुंडात मी प्रवेश केल्याचे सांगतो. त्या अग्नीकुंडाची समिधा होण्यास मला आवडेल, असे सांगत ती सुरेशच्या घरी राहाते. सुरेश गावातील प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या सभेत ग्रामस्थांना जमीन देऊ नका, असे सांगतो. संपूर्ण गाव त्याच्या बाजूने असतो; मात्र गावचा खोत सरपंचाच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्यांना जमिनी विकायला भाग पाडतो. यासाठी सुरेशच्या होणाऱ्या सासऱ्यांचा खून करतात. सुरेशला जेल होते. अखेरीस, सुरेशचे वडील या प्रकल्पासाठी जमीन विकतात आणि त्याची सुटका करतात. त्यानंतर पोलिसांना खरा खुनी सापडतो. प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या अंधारात जमीन बळकावणाऱ्या खोत आणि सरपंच यांचीच खेळी असल्याचे स्पष्ट होते. त्या दोघांनाही पोलिस पकडून घेऊन जातात. गावातील अनिष्ट रूढी-परंपराही गावाच्या विकासाच्या आड येतात. त्यामुळे लोकांची प्रगती होत नाही. या अनिष्ट रूढी कशा चुकीच्या आहेत या विषयीचे प्रबोधनही नाटकातून करण्यात आले आहे.

सूत्रधार आणि साहाय्य
प्रकाशयोजना ः नितीन बैकर, पार्श्वसंगीत ः योगेश बांद्रे, अविनाश गोसावी. नेपथ्य ः प्रवीण धुमक, रंगभूषा ः रमाकांत घाणेकर, वेशभूषा ः लवू भातडे.

पात्र परिचय
खोत ः संतोष सारंग, सरपंच ः हरिश रेवाळे, सुरेश ः सूर्यकांत गोताड, तात्या ः सचिन शितप, बाबा ः दामोदर गोरिवले, नरेश व इन्स्पेक्टर ः किशोर फडकले, हवालदार व गावकरी ः दिनेश निंबरे, सख्या ः लवू भातडे, सुमन ः श्वेताली अडसूळ, धर्मा ः प्रदीप रेवाळे, गावकरी ः अनंत गोताड, अनंत पातये, ओमकार आंबेकर. गावकरी महिला ः सिद्धी साळवी, सायली खापले.

आजचे नाटक
नाटक ः रात्र संपली; पण उजाडलं कुठं? सादरकर्ते ःआश्रय सेवासंस्था, रत्नागिरी. स्थळ ः स्वा. सावरकर नाट्यगृह, मारूती मंदिर, रत्नागिरी. वेळ ः सायं. ७ वा.