देव्हारे हायस्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देव्हारे हायस्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन
देव्हारे हायस्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन

देव्हारे हायस्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन

sakal_logo
By

rat9p7.jpg
67493
देव्हारेः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मुख्याध्यापक रामचंद्र कापसे.
----------
देव्हारे हायस्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन
मंडणगडः देव्हारे पंचक्रोशी माध्यमिक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम झाला. याचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक रामचंद्र कापसे यांनी भूषवले. कार्यक्रमाला कुंडलिक यादव, अमित रसाळ, योगेशकुमार केसरे, वैभव पाध्ये, श्रीकांत दळवी, अशोक तांबडे, रोहित तांबे उपस्थित होते. मुख्याध्यापक कापसे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी मनोगत व्यक्त करताना महामानव डॉ. आंबेडकर यांच्या विचारकार्याची महती समजावून सांगितली.
---------------------
मिस्त्री हायस्कूलला विजेतेपद
पावस ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत रत्नागिरीतील मिस्त्री हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने व मुलींच्या संघाने विजेतेपद प्राप्त केले. दोन्ही संघांना क्रीडाशिक्षक सैफन चरके यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक जुबेर गडकरी, पर्यवेक्षक मुश्ताक आगा, शाळा समितीचे अध्यक्ष निसार लाला, सचिव तनवीर मिस्त्री आणि सहसचिव जाहीर मिस्त्री ,संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
---------