आंतरराष्ट्रीय पर्यावरणमित्र संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्हा शाखेचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरराष्ट्रीय पर्यावरणमित्र संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्हा शाखेचा गौरव
आंतरराष्ट्रीय पर्यावरणमित्र संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्हा शाखेचा गौरव

आंतरराष्ट्रीय पर्यावरणमित्र संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्हा शाखेचा गौरव

sakal_logo
By

rat9p6.jpg-
67492
पुणेः आंतरराष्ट्रीय पर्यावरणमित्र संस्थेतर्फे रत्नागिरी शाखेचा गौरव करताना मान्यवर.
--------------
आंतरराष्ट्रीय पर्यावरणमित्र संस्थेतर्फे
रत्नागिरी जिल्हा शाखेचा गौरव
गावतळे, ता. ९ः आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य करत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरणमित्र बहुउद्देशीय संस्था (भारत) या संघटनेचे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन हिवाळी अधिवेशन आकुर्डी (पुणे) येथे उत्साहात झाले. या वेळी रत्नागिरी जिल्हा शाखेचा गौरव करण्यात आला.
या अधिवेशनाला विशेष पोलिस महानिरीक्षक सेवानिवृत्त डॉ. विठ्ठलराव जाधव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर उषा (माई) ढोरे, प्रादेशिक वनीकरणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर, तेजस्विनी महिला विकास सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा संगिता शिंदे आदी उपस्थित होते.
पर्यावरण, समाजप्रेमींना राष्ट्रीय समाजभूषण, वनश्री, कृषिरत्न, हिरकणी, आदर्श शिक्षक, रक्तदाता, आदर्श पत्रकारिता, आरोग्यदूत, राष्ट्रीय पर्यटनभूषण, कलागौरव, क्रीडा पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी गौरवण्यात आले. या संपूर्ण राष्ट्रीय अधिवेशनाचे नियोजन संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेच्या मंगेश कडवईकर, ज्योती ढवण, तृप्ती गावडे, दीपक आयरे यांनी केले होते.