सावंतवाडी महिला पतसंस्था निवडणूक बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी महिला पतसंस्था
निवडणूक बिनविरोध
सावंतवाडी महिला पतसंस्था निवडणूक बिनविरोध

सावंतवाडी महिला पतसंस्था निवडणूक बिनविरोध

sakal_logo
By

67570
सावंतवाडी ः विजयी खूण दाखविताना येथील महिला पतसंस्थेच्या उमेदवार.

सावंतवाडी महिला पतसंस्था
निवडणूक बिनविरोध
सावंतवाडी, ता. ९ ः येथील तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली आहे. या निवडणुकीत अकरा जागांसाठी अकरा जणांनीच नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. त्यामुळे ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. या निवडणुकीत संस्थेच्या सभासदांमधून निवडलेले म्हणजेच सर्वसाधारण गटांतून आठ महिलांची बिनविरोध झाली आहे. सर्वसाधारण गटातून कीर्ती बोंद्रे, सपना तुळसकर, देवता मुंज, वैभवी नेवगी, सपना विरनोडकर, क्षिप्रा सावंत, छाया देशपांडे, सानिका शिरोडकर. अनुसुचित जाती-जमातीमधून माधुरी वाडकर, इतर मागास प्रवर्ग-श्वेता शिरोडकर व भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग (राखीव)-रेखा भुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. आर. आरोवंदेकर यांनी काम पाहिले.