
बोंड्ये-नारशिंगे ग्रुप ग्रामपंचायत बिनविरोध
rat०९११.txt
(पान २ साठी)
रणधुमाळी--लोगो
बोंड्ये-नारशिंगे ग्रुप ग्रामपंचायत बिनविरोध
गावपॅनेलचा वरचष्मा ; राजकीय रंग बाजूला, मुलभूत प्रश्नांसाठी एकोपा
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. ९ः तालुक्यातील बोंड्ये-नारशिंगे ग्रामपंचायतीवर गावपॅनलची बिनविरोध निवड झाली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीवेळी जसे सर्वच्या सर्व आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्याप्रमाणे २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत या ग्रामपंचायतीवर गावपॅनेलचे आठही उमेदवार गावाच्या एकजुटीवर बिनविरोध झाले.
या गावातील ग्रामस्थांची एकजूट कायम आहे. गावविकासासाठी राजकीय रंग न देता एकीच्या भावनेने सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. गावातील विकासकामांना गती देतात. पक्षीय राजकारणाचे वातावरण न रंगवता लोकांच्या मुलभूत प्रश्नाकडे लक्ष वेधून विकासकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाते. सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान ही ग्रामपंचायत दुसऱ्यांदा बिनविरोध झाली आहे. या गावात वाडीप्रमुख, गावप्रमुख, वयोवृद्ध व्यक्ती, महिला, तरुण, सामाजिक कार्यकर्ते , पदाधिकारी अतिशय माणुसकीच्या व्यापक दृष्टिकोनातून सर्वांच्या सुख-दुःखात आपलेपणाने सहभागी होतात, हे या गावाचे खास वैशिष्ट्य आहे.
बिनविरोध आलेले गावपॅनेलचे सदस्य
सरपंचपदी- गणेश कृष्णा कांबळे
सदस्य- महेश सदाशिव देसाई, सुनील अनंत धावडे, मनोहर जानू पानगले, साक्षी सत्यवान कुळ्ये, शुभांगी चंद्रकांत कांबळे, अस्मिता अनिल शितप, मैथिली महेश पांचाळ.