गणेशगुळ्यात शिंदे गट-भाजपा एकमेकांविरोधात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशगुळ्यात शिंदे गट-भाजपा एकमेकांविरोधात
गणेशगुळ्यात शिंदे गट-भाजपा एकमेकांविरोधात

गणेशगुळ्यात शिंदे गट-भाजपा एकमेकांविरोधात

sakal_logo
By

rat०९१२.txt

बातमी क्र..१२ (पान २ साठीमेन)

रणधुमाळी--लोगो

गणेशगुळ्यात शिंदे गट-भाजपा एकमेकांविरोधात

युती निष्फळ ; ठाकरे सेनेचे तीनच उमेदवार रिंगणात

पावस, ता. ९ ः रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना व भाजप यांच्यामध्ये युती होऊ न शकल्याने सरपंचपदासाठी तिरंगी लढत होणार आहे. ठाकरे सेनेला उमेदवार न मिळाल्याने त्यांनी फक्त एकाच प्रभागामध्ये दोन व एक सरपंचपदासाठी उमेदवार रिंगणात उतरला आहेत. त्यामुळे ठाकरे सेनेच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

या ग्रामपंचायतीवर २००२ मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. २००७ व २०१२ या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार उदय सामंत यांच्या विचाराचे व खंदे समर्थक सरपंचपदावर बसले होते. त्यांची सत्ता निर्विवाद होती. २०१७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच निवडणुकीत शिवसेनेचे सुनील लाड व भाजपाचे संदीप शिंदे यांची लढत झाली होती. यावर्षीच्या निवडणुकीमध्ये सुरवातीला ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे ठरले होते; परंतु जागांचे गणित न जुळल्याने व शिवसेनेमध्ये दोन गट झाल्यामुळे या गोष्टी साध्य झाल्या नाहीत. गेली पाच वर्षे भाजपातर्फे विविध विकासकामांच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला होता. तसेच आमदार उदय सामंत यांनी विविध योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध दिला होता. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना व भाजप यांची युती होईल, अशी शक्यता होती; परंतु एकमत झाले नाही. शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख (कै.) सुनील तथा बाबू तोडणकर यांचे चिरंजीव शिंदे गटात गेल्यामुळे त्यांचे समर्थक शिंदे गट सामील झाल्यामुळे ठाकरे सेनेची बाजू फारच कमकुवत झाली आहे. त्यामुळे ठाकरे सेनेकडे उमेदवारांची चणचण निर्माण झाल्यामुळे अखेर सज्जन लाड यांनी आपली पत्नी श्वेता लाड यांना ठाकरे सेनेतर्फे थेट सरपंच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे तीन प्रभागांपैकी प्रभाग दोनमध्ये ठाकरे सेनेचे फक्त दोनच उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दोन सदस्य व एक सरपंचपद असे एकूण तीन उमेदवार ठाकरे सेनेकडून रिंगणात आहेत.

भाजपातर्फे सात जागांसाठी सात उमेदवार उभे केले आहेत. यात प्रामुख्याने विद्यमान सरपंच संदीप शिंदे यांचा समावेश आहे. थेट सरपंच निवडणुकीच्या रिंगणात भाजपातर्फे संपदा गुरव या रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. तसेच प्रभाग दोनमध्ये सज्जन लाड व संदीप शिंदे या दोघांमध्ये लढत होणार आहे. प्रभाग एकमध्ये संदीप शिंदे व प्रसाद तोडणकर यांच्यात लढत होणार आहे.

चौकट
शिंदे गट सर्व जागा लढविणार

निवडणुकीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना या पार्टीने प्रथमच आपले संपूर्ण पॅनेल उभे केले असून सात जागांसाठी सात उमेदवार उभे केले आहेत. थेट सरपंच निवडणुकीसाठी श्रावणी रांगणकर रिंगणात उतरले आहेत. गेल्या पाच वर्षात आमदार उदय सामंत यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर व भविष्यात विकासनिधी आणण्याकरिता पॅनेल प्रयत्नशील असल्याचा मुद्दा प्रचारात वापरला जाणार आहे.