गुहागर-ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांचा सावध पवित्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर-ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांचा सावध पवित्रा
गुहागर-ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

गुहागर-ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

sakal_logo
By

पान २ साठी

राजकीय पक्षांचा सावध पवित्रा
गुहागर तालुका; निकालानंतरच करणार वर्चस्वाची घोषणा
गुहागर, ता. ९ : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीमधील सरपंचपदाच्या आणि १३ सदस्यपदाच्या निवडणुकांवर पक्षांचा प्रभाव आहे. महाविकास आघाडी, भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युती आणि तीन ग्रामपंचायतींमध्ये मनसे आपल्या उमेदवारांना साथ देत आहेत. मात्र खुलेपणाने हे आमच्या पक्षाचे सरपंचपदाचे उमेदवार असे सांगण्यात कोणताच पक्ष तयार नाही. निवडणुका झाल्यावर आम्ही ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात ते सांगू, असा सावध पवित्रा सर्व राजकीय पक्षाच्या तालुकाप्रमुखांनी घेतला आहे.
या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर म्हणाले, ‘‘मविआमध्ये कोणते उमेदवार राष्ट्रवादीचे व कोणते अन्य घटक पक्षांचे हे आत्ताच सांगणे योग्य होणार नाही. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर २१ ग्रामपंचायतींपैकी किती ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिंकल्या ते आम्ही जाहीर करू.’’ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले, ‘‘निवडणुका होणाऱ्या १२ ग्रामपंचायतींचे सरपंच मविआचेच असतील.’’ बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर म्हणाले, युती म्हणून आम्ही एकत्रित निवडणुका लढवत आहोत. आमची ताकद असलेल्या ५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये आम्ही अधिक लक्ष घातले आहे. उर्वरित ठिकाणी भाजपला आम्ही मदत करत आहोत. भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे म्हणाले, ‘‘युती म्हणून एकत्र बसून संवादाने आम्ही निवडणुकांना सामोरे जात आहोत. ५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते उमेदवार आहेत. सरपंचपदाचे २ उमेदवार भाजपचे मतदार आहेत.’’