महाविद्यालयीन वयातच समाजाशी एकरूप व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविद्यालयीन वयातच समाजाशी एकरूप व्हा
महाविद्यालयीन वयातच समाजाशी एकरूप व्हा

महाविद्यालयीन वयातच समाजाशी एकरूप व्हा

sakal_logo
By

rat०९३६.txt

(पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat९p२५.jpg ः
६७५८८
अडूर ः खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना पोलिस निरीक्षक पाचपुते.

महाविद्यालयीन वयातच समाजाशी एकरूप व्हा

पोलिस निरीक्षक पाचपुते ; एनएसएसचे शिबीर अडूरला
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ९ ः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गावाशी, समाजाशी एकरूप व्हावे. आपली ग्रामपंचायत, अन्य संस्था यांची रचना जाणून घ्यावी. त्यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास घडेल, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी केले. ते खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिराच्या उद्‌घाटन समारंभात बोलत होते.
तालुक्यातील अडूर येथे खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर होत आहे. या शिबिराच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक पाचपुते, पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग कापले, सरपंच शैलजा गुरव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी पांडुरंग कापले म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी कीडा न होता विविध प्रकारची कामे केली पाहिजेत. अशा शिबिरातून होणारे श्रमसंस्कार केवळ गुणांसाठी नसून नेहमीच्या आयुष्यातही उपयोगी पडतील. त्याचबरोबर समाजासाठी आपण कायम उपयोगी राहू, याकडेही लक्ष द्यावे. सरपंच शैलजा गुरव यांनी विद्यार्थ्यांना निवासी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
प्र. प्राचार्य विराज महाजन म्हणाले, राष्ट्राचे भावी नागरिक कसे असावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली. दुसऱ्यांसाठी झगडण्यामुळे जो अनुभव मिळतो यातून स्व:जळून पडते आणि जेव्हा स्व:गळून पडेल तेव्हा माणूस श्रेष्ठ होतो. त्यातून राष्ट्र उन्नत होते. शिबिर मैत्रीपूर्ण वातावरण होतानाच मर्यांदामध्ये राहण्याचे संस्कार देणारेही आहे. श्रमदान-श्रमसंस्कार यातून विद्यार्थ्यांचा विकास महत्त्वाचा आहे. या वेळी प्रा. वीर पाटील, प्रा. रश्मी आडेकर, अडूर गावातील ग्रामपंचायत सदस्य, वाडीप्रमुख, ग्रामस्थ, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य विराज महाजन, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अनिल हिरागोंड उपस्थित होते.