
आमदार साळवी समर्थनासाठी एल्गार मोर्चा
rat०९४.txt
( पान ५ साठी मेन)
फोटो ओळी
-rat९p२४.jpg ः
६७५५८
लांजा ः लांजातील एल्गार मोर्चात बोलताना शरद कोळी.
आमदार साळवींच्या समर्थनासाठी एल्गार मोर्चा
लांजा दणाणले ; युवासेनेचे शरद कोळी भाजपवर बरसले
सकाळ वृत्तसेवा ः
लांजा, ता. ९ ः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटाने ठाकरे सरकार पाडले. आता कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील काही गावे घेऊ पाहते आहे, हे सरकार झोपा काढत आहे का? असा सवाल युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी करत महाराष्ट्र सरकार, शिंदे गट आणि भाजप यांच्यावर एल्गार मोर्चाप्रसंगी ताशेरे ओढले.
राजापूरचे आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाची नोटीस आल्याने त्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने आज लांजात एल्गार मोर्चा काढण्यात आला. कुलकर्णी-काळे छात्रालय ते योगी हॉटेल यादरम्यान काढलेल्या या मोर्चाला संबोधित करताना शरद कोळी म्हणाले, ज्या लोकांनी शिवसेनेला धोका देऊन माती खाल्ली त्यांच्या पोटाची अद्यापही खळगी भरली नाही का? वेळीच सुधारा, शिवसैनिकांच्या डोक्यात जाऊ नका. जंगलावर राज्य हे वाघच करू शकतो, हे लक्षात ठेवा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात किती लांडगे, कुत्रे गेले तरी वाघ हा वाघच असतो, हे लक्षात घेऊनच वागावे. आमदार राजन साळवी यांच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाच्या नादाला लागू नका. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल केलेत तरी तो माणूस कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही. त्यांच्या पाठीशी तालुक्यातलेच नव्हे तर राज्यभरातील शिवसैनिक आहेत .
या वेळी शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे, उपनेते गौरीशंकर खोत, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, महिला जिल्हा संघटक नेहा माने, जिल्हाप्रमुख विलास चाळके, राष्ट्रवादीचे नेते महम्मद रखांगी, आमदार राजन साळवी आदी उपस्थित होते.
अठरापगड जातींचा पांडुरंग
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राचा, शिवसैनिकांचा, अठरापगड जातींचा पांडुरंग आहे, असे सांगताच शिवसैनिकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कोळींनी भाषणाच्या सुरवातीलाच आपण खेड गावातील असून आपली रांगडी भाषा समजावून घेण्याचे आवाहन केले. शरद कोळींचे भाषण सुरू असताना शेजारील प्रशालेतून राष्ट्रगीताची सूचना मिळताच आपले भाषण थांबवून राष्ट्रगीत गात राष्ट्रप्रेम जागृत केले.