
केंद्र सरकारच्या कार्यालयात मेगाभरतीनिमित्त मार्गदर्शन सेमिनार
rat०९५१.txt
(पान ५ साठी)
मेगाभरतीनिमित्त सोमवारी मार्गदर्शन
चिपळूण, ता. ९ ः केंद्र सरकारच्या विविध कार्यालयात बारावी पास विद्यार्थ्यांसाठी ४५००हून अधिक जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या सविस्तर मार्गदर्शनासाठी शहराचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्यामार्फत सोमवारी (ता. १९) डिसेंबरला सकाळी १०.३० वा. सावरकर सभागृहात विद्यार्थी व पालकांसाठी मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागांसाठी दहावी, बारावी व पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भरती केली जाते. त्याचप्रमाणे आता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ४ हजार ५०० जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या द्वारे लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटरी असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी भरती केली जाणार आहे. माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी कोकणातील विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अर्ज भरण्याच्या तारखा, असणारी पदे, त्यांची निवडपद्धत, होणाऱ्या परीक्षेच्या तारखा, असणारा अभ्यासक्रम, विषय परीक्षेचे स्वरूप, प्रश्नाचे स्वरूप, त्याला लागणाऱ्या टेक्निक्स व सर्वसाधारण विद्यार्थ्यांची निवड होताना होणाऱ्या चुका याचे मार्गदर्शन या सेमिनारमधून होणार आहे. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबईचे विकास सावंत उपस्थित राहणार आहेत.