Mon, Feb 6, 2023

रघुनाथ केशव साळुंखे यांचे निधन
रघुनाथ केशव साळुंखे यांचे निधन
Published on : 9 December 2022, 1:09 am
rat9p36.jpg
67605
रघुनाथ साळुंखे
----------
रघुनाथ केशव साळुंखे यांचे निधन
दापोली, ता. ९ः तालुक्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले रघुनाथ केशव साळुंखे (वय ९४) यांचे शनिवारी (ता. ३) निधन झाले. राज्य परिवहन महामंडळाच्या दापोली डेपोमध्ये त्यांनी अनेक वर्षे सेवा बजावली आणि दापोली येथूनच ते सेवानिवृत्त झाले. एक मनमिळाऊ आणि सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. आयुर्वेदिक औषधांचा एक सच्चा पाईक म्हणून ते दापोलीत सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.