कणकवली :निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली :निधन
कणकवली :निधन

कणकवली :निधन

sakal_logo
By

kan९३.jpg
अरविंद कारेकर
67629
अरविंद कारेकर यांचे निधन
कणकवली, ता. ९ : कलमठ नाडकर्णी नगर येथील रहिवासी अरविंद वामन कारेकर (वय ८१) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. कारेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये आपली सेवा बजावली होती. काही काळ त्यांनी प्रभारी गटविकास अधिकारी म्हणूनही कार्य केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. नाडकर्णी नगर रहिवासी संघाचे ते क्रियाशील सदस्य होते. कुडाळ येथील सुवर्ण व्यावसायिक राजू पाटणकर यांचे ते सासरे होत.


६७६०७
kan९४.jpg
प्रदीप सर्पे
प्रदीप सर्पे यांचे निधन
कणकवली, ता. ९ ः कसवण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सर्पे (वय ५४) यांचे आज मुंबई येथे निधन झाले. कसवण बौद्धिय प्रगती मंडळ मुंबई, शाखेचे ते माजी सचिव तसेच मुंबई तालुका संघाचे क्रियाशील सदस्य, मतिमंद शाळा करंजे (ता. कणकवली) तांबे एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक होते. हरहुन्नरी, समाजाभिमुख, प्रसंगी तळागाळातील लोकांना मदतीचा हात पुढे करणारा कार्यकर्ता पडद्याआड झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, भाऊ अस परिवार आहे.

rat9p36.jpg
67605
रघुनाथ साळुंखे
----------
रघुनाथ केशव साळुंखे यांचे निधन
दापोली, ता. ९ः तालुक्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले रघुनाथ केशव साळुंखे (वय ९४) यांचे शनिवारी (ता. ३) निधन झाले. राज्य परिवहन महामंडळाच्या दापोली डेपोमध्ये त्यांनी अनेक वर्षे सेवा बजावली आणि दापोली येथूनच ते सेवानिवृत्त झाले. एक मनमिळाऊ आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्‍व म्हणून त्यांची ख्याती होती. आयुर्वेदिक औषधांचा एक सच्चा पाईक म्हणून ते दापोलीत सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.