
दारु वाहतुक करणारा ट्रक पलटी
swt९१९.jpg
६७६११
तोरसेः येथे महामार्गांवर पलटी झालेला कंटेनर.
swt९२०.jpg
६७६१२
तोरसे ः कंटेनरमधील दारूच्या बाटल्या रस्त्यावर विखुरल्या होत्या. (छायाचित्रे ः निलेश मोरजकर)
दारु वाहतुक करणारा ट्रक पलटी
तोरसेत अपघात ः चालक-क्लिनर बालबाल बचावले, रस्त्यावर पसरल्या दाऱुच्या बाटल्या
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ ः गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ओव्हरलोड कंटेनर मुंबई-गोवा महामार्गावार तोरसे (गोवा) येथे अवघड वळणावर पलटी झाला. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर आतील दारूच्या बाटल्या रस्त्यावर विखुरल्या होत्या. सुदैवाने चालक व क्लीनर बालंबाल बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांनाही गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही दारू वाहतूक गाडीच्या पासिंगवरून हरियाणा येथे होत असल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित कंटेनर (एचआर ५५ एक्स ३०९९) मधून गोवा बनावटीची बेकायदा दारू वाहतूक होत होती. तो ओव्हरलोड झाल्यामुळे तसेच चालक मद्याच्या नशेत असल्याने तोरसे येथे अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून कंटेनर रस्त्याच्या मधोमध दुभाजकात पलटी झाला. अपघातानंतर आतील दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर विखुरल्या होत्या. कंटेनरमध्ये दारूचे खोके लपविण्यासाठी प्लायवूडचे खोके बनविण्यात आले होते. त्यामुळे कंटेनर ओव्हरलोड झाला होता. चालक दारूच्या नशेत असल्याने तीव्र उतारावरील वळणावर कंटेनर पलटी झाला. दुभाजकात असलेल्या विद्युत पोलला धडक बसल्याने खांब उन्मळून पडला होता. अपघाताची तीव्रता लक्षात घेता आतील चालक व क्लिनर बालंबाल बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्या दोघांनाही गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गाडीच्या पासिंगवरून ही दारू हरियाणा येथे नेली जात असल्याचे समजते. मात्र, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. पेडणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
----------
चौकट
चोरट्या दारू वाहतुकीत वाढ
गेल्या चार दिवसात गोव्यातून महाराष्ट्र, गुजरात राज्यात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात गोवा, सिंधुदुर्ग अबकारी खात्याने व बांदा पोलिसांनी सलग कारवाया केल्या आहेत. यामध्ये १ कोटी रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. आज देखील अपघातग्रस्त कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा दारूचा साठा सापडल्याने दारूची मोठ्या प्रमाणात बेकायदा वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने तसेच वर्ष अखेर असल्याने मोठ्या प्रमाणात दारू वाहतुकीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गोवा व सिंधुदुर्ग तपासणी नाक्याना अलर्ट राहावे लागणार आहे.
-----------