रत्नागिरी-मुख्यमंत्री रत्नागिरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-मुख्यमंत्री रत्नागिरीत
रत्नागिरी-मुख्यमंत्री रत्नागिरीत

रत्नागिरी-मुख्यमंत्री रत्नागिरीत

sakal_logo
By

rat०९५६g.txt

(पान १ साठी)

मुख्यमंत्री शिंदे शुक्रवारी रत्नागिरीत

५०० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन ; विक्रमी सभेचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. ९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी (ता.१६) रत्नागिरी दौरा निश्चित झाला असून या दिवशी रत्नागिरीतील तब्बल ५०० कोटीहून अधिक रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरीतील राजकीय इतिहासातील विक्रम मोडेल अशी ही भव्यदिव्य सभा होईल, असे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पालकमंत्री सामंत यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, स्व. प्रमोद महाजन क्रीडासंकुलाची जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्‍यांसह पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याविषयी माहिती देताना म्हणाले की, मुख्यमंत्री सकाळी अकरा वाजता विवेक हॉटेलच्या हॉलमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या विकासाबाबत प्रशासकीय आढावा घेतली व त्यांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर ५ वी ते १० वीच्या मुलांच्या हस्ते तारांगणाचे उद्घाटन होईल. यावेळी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रत्नागिरीतील इंजिनिअरींग कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल.

या दौऱ्‍यात रत्नागिरी मतदार संघातील ५०० कोटीहून अधिक कामांचा आरंभ एका क्लिकवर मुख्यमंत्री करणार आहेत. यामध्ये १३७ कोटीची मिऱ्या- हातखंबा नळपाणी योजना, १०६ कोटीचे शहरातील काँक्रीटच्या रस्त्यांचे भूमिपूजन, १०० कोटीहून अधिकच्या किंमतीचे पोलिस अधीक्षक कार्यालय, पोलिस कर्मचारी वसाहत, ९३ कोटी रुपयांचे नाणीज येथील धरण, ३२ कोटींचे जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेसाठीचे कळझोंडी येथील धरणाच्या कामाचा समावेश आहे. या विकासात्मक दौऱ्‍यानिमित्ताने रत्नागिरीत येणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांची विक्रम मोडणारी अभूतपूर्व अशी सभा रत्नागिरीत सायंकाळी ४ वाजता प्रमोद महाजन क्रीडांगणावर होईल, असे सामंत यांनी सांगितले.


जमीन मालकाना चौपट दर
रत्नागिरी विमानतळाच्या भूमीअधीग्रहणासाठी ७७ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी जमिनीला गुंठ्याला ४७ हजार रुपये दर निश्चित करण्यात आला असून जमीन मालकांना आता त्याच्या चौपट, असा १ लाख ८८ हजार रुपये भाव दिला जाणार आहे. टर्मिनल इमारतीचे काम पुढील महिनाभरात सुरु होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.