पान तीन मेन-गुन्हे दाखल असलेल्यांवर नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान तीन मेन-गुन्हे दाखल असलेल्यांवर नजर
पान तीन मेन-गुन्हे दाखल असलेल्यांवर नजर

पान तीन मेन-गुन्हे दाखल असलेल्यांवर नजर

sakal_logo
By

६७६३७

पान तीन मेन

टीपः swt९२३.jpg मध्ये फोटो आहे.


गुन्हे दाखल असलेल्यांवर नजर
पोलिस अधिक्षक ः ग्रामपंचयात लढतीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही गाव भेटी देत आहोत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्या गावाचा इतिहास पाहून त्यानुसार अभ्यास करत आहोत. ज्या लोकांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांचे रेकॉर्ड तपासले जाणार आहे. त्यांच्यावर पोलिसांचा बारीक लक्ष आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी आज येथे दिली.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अग्रवाल हे आज येथे आले होते. या दरम्यान त्यांनी पोलिस कर्मचारी वसाहतीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी येथील पोलीस ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके, पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
श्री. अग्रवाल म्हणाले, "जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी गाव भेटी देत आहेत. ग्रामस्थांकडून आणि पोलीस पाटलांकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही लक्ष ठेवणार आहोत. एखाद्या गावात यापूर्वी झालेल्या मारामारी, भांडणे याचा अभ्यास करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आंबोली पोलिस दूरक्षेत्र अतिदुर्गम भागात आहे. त्या ठिकाणी पोलिसांना आवश्यक त्या सोई सुविधा देण्याबाबत भेट देऊन माहिती घेतली जाईल. गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणावरं होणाऱ्या चोरट्या दारूवाहतुकीला रोखण्यासाठी अॅक्शन प्लॅन केला आहे. त्यानुसार कारवाई सुरू आहे आणि यापुढे सुद्धा अशीच कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याच अनुषंगाने नियोजनासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आम्ही अलर्ट आहोत. पोलीस कर्मचाऱ्यांनासुद्धा याबाबतचे ट्रेनिंग देण्यात येणार आहे." येथील उभा बाजार परिसरात असलेल्या जुन्या पोलीस स्टेशनच्या इमारतीकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता, त्या संदर्भात सुद्धा माहिती घेऊन त्या ठिकाणी काही उपक्रम राबवता येऊ शकतो का? याबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


पोलिस वसाहतीबाबत
वरिष्ठांशी चर्चा करणार
श्री. अग्रवाल म्हणाले, "येथील पोलीस ठाणे हद्दीतील जागेची व पोलीस वसाहतीची आज मी पाहणी केली. प्रथमदर्शनी पाहता पोलीस वसाहतीतील इमारतींची दयनीय अवस्था झाली आहे. ती सुधारण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात का? या संदर्भात पोलीस दल आणि वरिष्ठांशी चर्चा करणार आहे."


सिंधुदुर्गात सायबर
क्राईममध्ये वाढ
श्री. अग्रवाल म्हणाले, "जिल्ह्यात इतर गुन्हेगारीचे प्रमाण कमी असले तरी सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. स्मार्टफोन वापराविषयी ज्ञानात अभाव असल्यामुळे ही समस्या उद्भवत आहे. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना प्रत्येकाने खबरदारी कशी घ्यावी. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेज आणि अमिषांना कोणीही बळी पडू नये. यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पुढील काळात सिंधुदुर्ग सायबर सेल आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविली जाईल."