बिबट्याचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याचे दर्शन
बिबट्याचे दर्शन

बिबट्याचे दर्शन

sakal_logo
By

rat१११४.txt

(टुडे पान ३ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat११p४.jpg
६७८१९
खेड : गेल्या आठवड्यापासून या विभागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे.


खोपी धामणंद मार्गावर बिबट्याचे दर्शन

खेड : येथील खोपी - धामणंद विभागात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. संध्याकाळ झाली की, बिबट्यांचा मानवी लोकवस्ती असलेल्या खोपी, मिरले, शिरगाव, कासई गावांच्या परिसरात मुक्त संचार पाहायला मिळत आहे. बिबट्याच्या डरकाळ्यांनी गेल्या आठवड्यापासून हा परिसर दणाणून गेला आहे. गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खोपी ते धामणंद मार्गावरील कासई घाटात चक्क मार्गावरच बिबट्याचे दर्शन झाले. एका वाहनचालकाने या बिबट्याला आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केले. महत्वाचं म्हणजे या विभागात खोपी हायस्कूल येथून सायंकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर जंगलभागातून विद्यार्थ्यांना आपल्या घरी जावे लागते. बिबट्याच्या भीतीने अनेक ग्रामीण भागातील मुले घाबरली असल्याचे सांगण्यात आले आहे.

---
फोटो rat११p५.jpg
६७८२०
खेड ः शिवतेज आरोग्य संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करतांना आमदार योगेश कदम सोबत संजय मोदी अन्य पदाधिकारी ( सिध्देश परशेट्ये : सकाळ छायाचित्रसेवा )

रुग्णवाहिकेचे लोकार्पण

खेड : येथील शिवतेज आरोग्य संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार योगेश कदम यांच्या हस्ते शनिवारी (ता.१०) दुपारी करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते. शहरातील शिवतर मार्गांवरील श्री शिव समर्थ रिक्षा चालक मालक संघाच्या मागणीवरून रुग्णसेवा करण्यासाठी माजी मंत्री रामदास कदम, आमदार योगेश कदम व सिद्धेश कदम यांच्या पुढाकाराने ही रुग्णवाहिका रिक्षा चालक मालक संघाला उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी संघाच्या वतीने आमदार योगेश कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार कदम यांनी शिवतेज आरोग्य संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. कोरोना कालावधीत संस्थेने शहरात कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी संस्थेची इमारत ऊपलब्ध करून दिली. त्याचबरोबर दाखल असलेल्या रुग्णांना औषोधपचार व इतर आवश्यकतेनुसार मदत केली असल्याचे सांगितले. शिवतेज संस्था आरोग्य क्षेत्रा बरोबर इतर ही अनेक सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे सांगून लवकरच आंबये येथे उभारण्यात आलेल्या पणन महामंडळाच्या शीतगृहाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती दिली. कोकणातील पहिलेच शीतगृह उभारण्यासाठी पणन महामंडळाला शिवतेज संस्थेने दोन एकर जमीन आंबये येथे मोफत उपलब्ध करून दिली आहे. या शीतगृहामुळे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सात तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल असे कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला संजय मोदी, शशिकांत चव्हाण, सचिन धाडवे, रामचंद्र आईनकर, शांताराम म्हसकर, मीनार चिखले, प्रसाद शिगवण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

---
सर्प पकडण्याच्या साहित्यास देणगी

दाभोळ : साप पकडण्यासाठी साहित्य खरेदीसाठी सर्पमित्र तुषार महाडीक यांना रोख व धनादेशाद्वारे मदत करण्यात आली आहे. दापोली तालुक्यातील वाकवली येथील निवृत्त सैनिक व ग्रामस्थ नितीन सागवेकर यांनी सर्पमित्र तुषार महाडीक व मिलिंद गोरीवले यांच्या साप वाचविण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाला शुभेच्छा दिल्या. साप पकडण्यासाठी लागणाऱ्‍या वस्तू खरेदी करण्यासाठी ६ हजार रुपयांचा धनादेश दिला व वाकवली गावातील व्यापारी लक्ष्मण नाटेकर यांनीही ५ हजार रुपये यासाठी दिले असून साप पकडण्यासाठी लागणऱ्‍या वस्तू सर्पमित्र तुषार महाडीक यांनी खरेदी केल्या आहेत.
---
rat११p६.jpg
६७८२१
साखरपा : निकीता सुनील सुवरे हिचे अभिनंदन करताना केंद्रप्रमुख रामचंद्र कुवळेकर

निकीता सुवरे हिचे यश

साखरपा : जिल्हा परिषद शाळा देवडे नं १ येथील पाचवीची विद्यार्थिनी निकीता सुनील सुवरे हिने परीक्षेत यश संपादन केले आहे. नासा इस्रो चाळणी परीक्षेत तिने ९४ गुण मिळवले आहेत. साखरपा बीट मधून प्रथम येण्याचा मान निकीता हिने मिळवला असून तिची निवड तालुका स्तरासाठी झाली आहे. मुख्याध्यापक भोलाजी माने, शिक्षिका सुनीता कचरे, निलम शेडे, उपशिक्षक अमोल मिसाळ तसेच केंद्रीय प्रमुख रामचंद्र कुवळेकर यांनी तिला मार्गदर्शन केले होते. किरबेट केंद्रीय प्रमुख रामचंद्र कुवळेकर यांनी नूकतीच देवडे नं १ शाळेला भेट देवून निकीता हिचे अभिनंदन केले.
---