संत राऊळ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत राऊळ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
संत राऊळ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

संत राऊळ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

67844
कुडाळ ः मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात यश प्राप्त विद्यार्थी. शेजारी संत राऊळ महाराज कॉलेजचे प्राचार्य व प्राध्यापक. (छायाचित्र ः अजय सावंत)

संत राऊळ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव; आता स्नेहसंमेनासाठी पूर्वतयारी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या यशानंतर आता महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या नियोजनातून २३ ला होणाऱ्या स्नेहसंमेलनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपले सुप्त कलागुण सादर करण्याची सुवर्णसंधी संत राऊळ महाराज महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. या संधीचे सोने करीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कथा लेखन, एकांकिका, व्यंग्यचित्र आणि लोकनृत्य या स्पर्धा प्रकारांमध्ये कांस्य पदकांसहित यश प्राप्त केले. सुयश भोवड (टीवायआयटी) याने व्यंग्यचित्र ललित कला प्रकारात तिसरा येत कांस्य पदक मिळविले. लोकनृत्य प्रकारात चैताली खवणेकर, दिव्या मेस्त्री, सोनल वेंगुर्लेकर (एसवायबीकॉम), धनश्री मेस्त्री (टीवायबीए), हर्षदा गवस (एफवायबीकॉम), साक्षी राऊळ (एसवायबीएस्सी), तन्मयी परब (एफवायबीए), सायली राऊळ, निकिता हरमलकर (टीवायबीकॉम) या विद्यार्थिनींनी कांस्यपदक, प्राची देसाई (एसवायबीए) हिने इंग्रजी कथालेखनात तर शेफाली कशाळीकर (एसवायबीएस्सी), सानिका कुंटे (एफवायबीकॉम) यांनी स्त्री अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. क.म.शि.प्र. मंडळाचे संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. व्ही. जी. भास्कर. कॅप्टन डॉ. एस. टी. आवटे, प्रा. पी. डी. जमदाडे, प्रा. डॉ. आर. वाय. ठाकूर, प्रा. डॉ. वाय. जे. कोळी, प्रा. संतोष वालावलकर, प्रा. सबा शहा, प्रा. एस. एस. चांदेकर, प्रा. राजगुरू, प्रा. योगिता वाईरकर, प्रा. बी. व्ही. थिएटरचे, केदार सामंत तसेच नाट्यदिग्दर्शक केदार देसाई, भूषण बाक्रे, डॉ. शरावती शेट्टी आदींचे सहकार्य लाभले.
---
स्नेहसंमेलन २३ रोजी
महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन २३ ला होत असून २२ ला फन फेअर व फनी गेम्स होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयामध्ये पूर्वतयारी सुरु झाली आहे. स्नेहसंमेलनास पालक व नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. झोडगे यांनी केले आहे.