
वेंगुर्लेकर महाविद्यालयात एड्सविरोधात जनजागृती
वेंगुर्लेकर महाविद्यालयात
एड्सविरोधात जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर तिठाच्या राष्ट्रीय सेवायोजना विभागाच्यावतीने १ ते ७ डिसेंबर या कालावधीत एड्स विरोधात जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयात एड्स या विषयावर घेण्यात आलेल्या रांगोळी, पोस्टर मेकिंग व वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धांचा निकाल अनुक्रमे असा ः रांगोळी स्पर्धा-एसवाय बीकॉम, एसवाय बीएस्सी आयटी, एफवाय आयटी व एफवाय बँकिंग इन्शुरन्स, उत्तेजनार्थ टीवाय बीएस्सी आयटी. पोस्टर मेकिंग स्पर्धा-मनिषा तेजम (एफवाय बीकॉम), कांचन आगलावे (एफवाय बँकिंग इन्शुरन्स), मयुरी सावंत (एसवाय आयटी). वक्तृत्व स्पर्धा-मयुरी सावंत (एसवाय आयटी), ग्रेसी पिंटो (एसवाय बँकिंग इन्शुरन्स), कविता चव्हाण (एसवाय बीकॉम), उत्तेजनार्थ सृष्टी सावंत (एफवाय आयटी). या स्पर्धांचे परीक्षक म्हणून प्रा. सचिन वासकर, प्रा. प्रसाद ओटवकर, प्रा. तन्वी सिंघन यांनी काम पाहिले. या सप्ताहाची सांगता ७ ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी प्राचार्यांनी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची नावे घोषित करून विजेत्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस विभागप्रमुख प्रा. डी. व्ही. गावडे यांनी, आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. स्मिता परब यांनी व्यक्त केले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सदस्य प्रा. अमेय पाटकर, प्रा. प्रथमेश गोसावी, सदस्या प्रा. मृणाली कुडतरकर आदी उपस्थित होते.