यापुढे कामे मंजूर होणार कधी अन ठेकेदार करणार कधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यापुढे कामे मंजूर होणार कधी अन ठेकेदार करणार कधी
यापुढे कामे मंजूर होणार कधी अन ठेकेदार करणार कधी

यापुढे कामे मंजूर होणार कधी अन ठेकेदार करणार कधी

sakal_logo
By

rat११४.txt

( टुडे पान १)

(कामांना मंजुरी अन् मुहूर्त कधी)

यापुढे कामे मंजूर कधी अन ठेकेदार करणार कधी

विकास कामांचे प्रस्ताव , आर्थिक वर्ष संपणार साडेतीन महिन्यानी

चिपळूण, ता. १२ : शिंदे - फडवणीस सरकारने १ एप्रिल २०२१ नंतर मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिली आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या नवीन प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही. आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ चार महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यापुढे कामे मंजूर होणार कधी आणि मंजूर झालेली कामे संबंधित कार्यालय ठेकेदारांकडून पूर्ण करून कधी घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जूनमध्ये सत्तांतर झाल्यानंतर ४ जुलैला जिल्हा वार्षिक योजनेतून २०२२-२३ या वर्षात प्राप्त झालेल्या नियोजनास स्थगिती दिली होती. त्यानंतर १ एप्रिल २०२१ नंतर मंजूर झालेल्या व कार्यारंभ आदेश न दिलेल्या कामांनाही स्थगिती देण्याचा निर्णय १९ जुलैला राज्य सरकारने घेतला होता. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर या कामांवरील स्थगिती उठवली जाईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. दरम्यान सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेतील निधीवरील स्थगिती उठवण्यात आल्याचे नियोजन विभागाने जाहीर केले होते. मात्र, एप्रिल २०२१ नंतर मंजूर झालेल्या २०२१-२०२२ या आर्थिक वर्षातील कामे रद्द करण्यात आली. अत्यंत महत्त्वाच्या कामांचा विचार केला जाईल असे पालकमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आले. १४ ऑक्टोबरला रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली. त्यात २७१ कोटीच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. आमदार, खासदारांसह संबंधित खात्याकडून प्रस्ताव मागण्यात आले. त्यामध्ये रस्ते, सिंचन, क्रीडा, कृषी व नगरोत्थान, पूरहानी आदी विभागांमधील कामांची शिफारस करण्यात आली आहे. संबंधितांकडून कामांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र जिल्हा नियोजन मंडळांकडून या कामांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

कोट
चिपळूण, संगमेश्वर आणि देवरूखमधील अत्यावश्यक कामांचे प्रस्ताव नियोजन मंडळाकडे पाठवण्यात आले आहे. पालकमंत्र्यांकडून या कामाना लवकरच मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे. ३१ मार्च अखेर कामे वेळेत करून घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. तातडीची कामे मंजूर होणे गरजेचे आहे.

आमदार शेखर निकम (चिपळूण)