आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, हेवेदावे विसरा ः कांबळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचारसंहितेचे काटेकोर पालन 
करा, हेवेदावे विसरा ः कांबळी
आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, हेवेदावे विसरा ः कांबळी

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, हेवेदावे विसरा ः कांबळी

sakal_logo
By

67860
कासार्डे ः आदर्श आचारसंहिता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विनोद कांबळी.

आचारसंहितेचे काटेकोर पालन
करा, हेवेदावे विसरा ः कांबळी
तळेरे ः आचारसंहितेचे काटेकोर पालन करा. आपापसातील हेवेदावे विसरून निवडणूक पार पाडा, अशा सूचना कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळी यांनी केल्या. ते कासार्डे येथे आयोजित केलेल्या ‘आदर्श आचारसंहिता’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक सचिन हूंदळेकर, पोलिस उपनिरीक्षक सागर खंडागळे, कासार्डे बीट अंमलदार चंद्रकांत झोरे, कासार्डे विद्यालयाचे पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर आदी उपस्थित होते. पोलिस निरिक्षक हूंदळेकर यांनी राजकारण हे निवडणुकीपुरते ठेवा. गावात शांतता असू द्या. प्रशासनास सहकार्य करून वादविवाद न करता निवडणूक पार पाडा, असे आवाहन केले. या कार्यक्रमास कासार्डे, तळेरे, ओझरम, दारुम गावातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कासार्डे पोलिस पाटील महेंद्र देवरुखकर, दारुम पोलिस पाटील संजय बिळसकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल जमदाडे यांनी, तर राजेश माळवदे यांनी आभार मानले.
---
६७७८४
कणकवली ः अजय सुतार यांचे स्वागत करताना सुधीर सावंत.

सांगवेतील सुतार शिंदे गटात
कणकवली ः सांगवे (ता.कणकवली) ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदाचे अपक्ष उमेदवार अजय सुतार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष्यात माजी खासदार ब्रि. सुधीर सावंत यांच्या हस्ते भगवा हातात घेऊन प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाला कनेडी पंचक्रोशीत उमेदवार मिळाला आहे. बाळासाहेबांची शिवसेना कणकवली संपर्क कार्यालयात प्रवेशासाठी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, शेखर राणे,तालुका प्रमुख भूषण परुळेकर,तालुका समन्वयक सुनील पारकर आदी उपस्थित होते.
---
फणसाड अभयारण्याचे आकर्षण
मुरूड ः धकाधकीच्या जीवनातून काही वेळ निवांत, निसर्गाच्या सान्निध्यात घालवायचा असेल, तर मुरूड तालुक्‍यात फणसाड अभयारण्यातील सहल पर्वणीच ठरते. पर्यावरणप्रेमी, पक्षी व वनस्पती अभ्यासकांचे आवडते ठिकाण असलेले फणसाड अभयारण्य जैवविविधतेने नटले आहेत. अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे उंच निलगिरीच्या झाडावर राज्‍यप्राणी शेकरूचे वास्‍तव्य. राज्‍यात एकूण ३२ अभयारण्य असून शेकरू केवळ भीमाशंकर व फणसाड अभयारण्यातच आढळतो.
शेकरू म्हणजेच मोठ्या आकाराची खार. लाजाळू प्राणी म्हणूनही तो ओळखला जातो. अलिकडे अभयारण्यात शेकरू हे बोधचिन्ह ठेवले आहे.मुंबईपासून १६० किमी अंतरावर फणसाड अभयारण्य असल्याने शहराबरोबरच उपनगरे, ठाणे, पालघरमधील पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. अभयारण्यात दरवर्षी सरासरी ३,००० मिमि एवढा पाऊस पडत असून उन्हाळ्यातही तापमान २५ ते ३० सेल्सियस असते. भारतातील बहुतांशी अभयारण्ये तथा राष्ट्रीय उद्याने राजे-महाराजे व संस्थानिकांच्या शिकारीच्या हौसेखातर राखून ठेवलेल्या क्षेत्रापैकी आहेत. अशाच प्रकारे पूर्वीचे केसोलीचे जंगल हे नबाब सिद्दींचे राखीव शिकार क्षेत्र म्‍हणजे आजचे फणसाड अभयारण्य असून १९८६ मध्ये सरकारने अधिसूचित केले.
--
पर्यटकांना कोकणाचे वेध
सावंतवाडी ः डिसेंबर सुरू होताच, आता पर्यटकांना कोकणचे वेध लागले आहेत. थंडीला सुरुवात झाल्याने या आल्हाददायी वातावरणात भटकंती करण्यासाठी पर्यटकांची तयारी सुरू झाली आहे. ८ डिसेंबरपासून पर्यटक जिल्ह्यात येण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना पर्यटकांची पसंती असल्याने जिल्ह्यातील निवासस्थानांचे आरक्षण ७५ टक्के फुल्ल झाले आहे. कोकणात थंडीच्या हंगामात पर्यटनाला बहर येतो. कोरोना काळात दोन वर्षे पर्यटन पूर्णपणे थांबले होते. गेल्या डिसेंबरपासून कोरोना कमी झाल्याने पुन्हा पर्यटन वाढू लागले आहे. गेल्या वर्षभरात पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. मे महिन्याप्रमाणेच यंदा हिवाळी पर्यटनासाठी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. शाळा‚ महाविद्यालयातील मुलांच्या प्रथम सत्रातील परीक्षाही आता आटोपल्या आहेत. त्यामुळे थंडीच्या हेल्दी सीझनमध्ये पर्यटक जिल्ह्यातील नयनरम्य पर्यटन स्थळाकडे येण्यासाठी उत्सुक आहेत.
---
स्थुलरोग तपासणी शिबिर आजपासून
सावंतवाडी ः येथील राणी जानकीबाई साहेब वैदयकीय संस्थेचे रुग्णालय आणि भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 14 डिसेंबर या कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत स्थुलरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या शिबिरात येणार्‍या रुग्णांना सात दिवसांची औषधे मोफत दिली जाणार आहेत. ज्या रुग्णांना उच्च रक्तदाब, नमधुमेह, हदयरोग, गुडघ्याचे दुखणे, मलबध्दता, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचाविकार, पायाच्या शिरा फुगणे, यकृताचे विकार, थॉयराईड, स्त्रियांमध्ये होणारे मासिक पाळीचे विकार, वंधत्व, चालताना दम लागणे आदी आजार असतील, त्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, प्राचार्य बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
---