गावडे आंबेरेत थेट सरपंच निवडणूक तिरंगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावडे आंबेरेत थेट सरपंच निवडणूक तिरंगी
गावडे आंबेरेत थेट सरपंच निवडणूक तिरंगी

गावडे आंबेरेत थेट सरपंच निवडणूक तिरंगी

sakal_logo
By

पान २

गावडे आंबेरेत थेट सरपंच निवडणूक तिरंगी
६ जागा बिनविरोध ; ३ जागांसाठी ८ उमेदवार
पावस्.ता.११. रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून थेट सरपंच निवडणूक तिरंगी होणार असून सहा जागा बिनविरोध झाल्या असून तीन जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात उतरले असून थेट सरपंच निवडणूक व एका प्रभागातील निवडणूक तिरंगी लढतीचा सामना होणार आहे त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे
सन २०१२ च्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीमध्ये निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. त्यावेळी भाजपच्या श्रीमती साधना आंबेरकर या सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या त्यानंतर २०१७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजप यांच्यामध्ये युती झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय करण्यात आला. नऊ पैकी सहा जागा बिनविरोध झाल्या होत्या व थेट सरपंचपदी युतीच्या माध्यमातून श्रीमती नम्रता आंबेडकर बिनविरोध निवडून आल्या होत्या मात्र एका प्रभागामध्ये कोणतीही तडजोड न झाल्यामुळे तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायतीवर युतीचे वर्चस्व राहिले होते नुकतेच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला त्यादृष्टीने गाव पॅनल करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु माझी ग्रामपंचायत सदस्य बळीराम डोंगरे यांनी ग्रामपंचायत सदस्य व थेट सरपंचपदाकरता इच्छुक असल्याचे सांगितल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. अखेरच्या क्षणापर्यंत गाव पातळीवर प्रयत्न करण्यात आले. मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे या खेपेस ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे ठरविण्यात आले व त्या दृष्टीने गाव पॅनल तयार करण्यात आले परंतु एका प्रभागांमध्ये एकमत होऊ न शकल्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. थेट सरपंच निवडणुकीकरिता गाव पॅनलतर्फे श्री लक्ष्मण सारंग मनसेतर्फे निखिल बिरजे व अपक्ष म्हणून बळीराम डोंगरे हे रिंगणात उतरल्यामुळे थेट सरपंच निवडणूक तिरंगी होणार आहे. नऊपैकी सहा जागा बिनविरोध झाल्यामुळे रंगतदार होणाऱ्या चुरशीच्या लढाया संपुष्टात आल्या आहेत. मात्र दोन प्रभागातील तीन जागांमध्ये कोणतीही तडजोड न झाल्यामुळे त्या प्रभागांमध्ये तीन जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे भाजपा तीन जागा बाळासाहेबांची शिवसेना दोन जागा उद्धव सेना पुरस्कृत बळीराम डोंगरे यांच्या तीन जागा लढवत आहेत.


चौकट
दोन प्रभागामध्ये पुन्हा रंगतदार
ग्रामपंचायतीमध्ये इतर जागा बिनविरोध होत असताना मागील निवडणुकीप्रमाणे दोन प्रभागामध्ये पुन्हा रंगतदार सामना होणार आहे. या दृष्टीने तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पावले उचलले आहेत. दिवसेंदिवस या प्रभागामध्ये वातावरण ढवळून निघत आहे, त्यामुळे या तीन जागा प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत