नीलेश राणेंकडून आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीलेश राणेंकडून आढावा
नीलेश राणेंकडून आढावा

नीलेश राणेंकडून आढावा

sakal_logo
By

rat11p7.jpg
67822
साखरपा : नीलेश राणे यांच्या उपस्थितीत अनिल चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश.

ग्रामपंचायत निवडणुकासाठी
नीलेश राणेंकडून आढावा
साखरपा, ता ११ : तोंडावर आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षीय सामर्थ्याचा आढावा घेण्यासाठी माजी खाजदार नीलेश राणे यांनी देवरुख दौरा केला. ह्यावेळी त्यांनी हातिव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली.या बैठकीत बोंडये गावातील माजी सरकारी कर्मचारी अनिल गोपीनाथ चव्हाण यांनी पक्षप्रवेश केला. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रूपेश कदम यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीत संगमेश्वर तालुक्यातील पंचायत समिती गणानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आढावा घेतला. कोणत्या गावात भाजपचे किती उमेदवार उभे आहेत, किती उमेदवार थेट सरपंच पदासाठी उभे आहेत यांची माहिती नीलेश राणे यांनी घेतली. बैठकीच्या शेवटी राणे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक लढविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. ह्या बैठकीस रूपेश कदम यांच्यासह तालुका सरचिटणीस अमित केतकर, रश्मि कदम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मुकुंद जोशी, ज्येष्ठा कार्यकर्ते श्रीकांत भागवत, कुंदन कुलकर्णी यांच्यासह साखरपा, मारळ, देवरुख पंचक्रोशीतील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.