वनस्पतींच्या जैवरसायनांचे विलगीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वनस्पतींच्या जैवरसायनांचे विलगीकरण
वनस्पतींच्या जैवरसायनांचे विलगीकरण

वनस्पतींच्या जैवरसायनांचे विलगीकरण

sakal_logo
By

वनस्पतींच्या जैवरसायनांचे विलगीकरण

कोकण कृषी विद्यापीठ; औषधी, सुगंधी अर्क काढण्यासाठी संशोधन

दाभोळ, ता. ११ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली व मटकृषी अँग्रोटेक प्रा. लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ गेली अनेक वर्षे फळ प्रक्रियेसंदर्भात विविध कार्यक्रम राबवित असून त्या प्रक्रियांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे. या सर्व गोष्टींच्या पुढे जाऊन विद्यापीठाने औषधी वनस्पतींमधील जैवरसायनांचे विलगीकरण, औषधी व सुगंधी अर्क काढण्यासाठी विद्यापीठ संशोधन करणार असून प्रशिक्षण देणार आहे.
मटकृषी आगामी काळात कृषी विद्यापीठाकरीता जैवरसायनांचे विलगीकरणचा पथदर्शी प्रकल्प (औषधी सुगंधी ) उभारणार आहे. तसेच त्यासाठी एक प्रमाणीकरण झालेली प्रयोगशाळा स्थापित करणार आहे. बऱ्याच काळापासून कोकणामध्ये हळदीची लागवड मोठया प्रमाणावर केली जाते म्हणून हळदीवर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आगामी वर्षामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये कुलगुरु डॉ. संजय सावंत यांच्या सुचनेनुसार हाती घेण्यात आले आहे. तर त्यासाठी या प्रकल्पामधून विद्यापीठामध्ये हळद व काळीमिरीचा अर्क काढणार व तेल काढण्यात येईल. या योजनेचा लाभ हा दापोली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात होणार आहे. या योजनेच्याव्दारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसेच त्यांच्या शेतातील हळदीतील गाभा काढून मिळेल. आगामी काळात हळद लागवडीला मोठया प्रमाणात वाव मिळणार आहे असा विश्वास कुलगुरु डॉ. संजय सावंत यांनी व्यक्त केला आहे. मटकृषी चे व्यवस्थापकिय संचालक, डॉ. रमण सोधी व संचालक, विक्रम मेहता यांच्या पुढाकाराने सामंजस्य करार करण्यात आला. यासाठी डॉ. सतीश नारखेडे, डॉ. प्रफुल्ल माळी, डॉ. प्रफुल्ल आहिरे आणि डॉ. अरुण माने या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहेत.
--
चौकट
सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धत
हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी या पध्दतीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठ तंत्रज्ञान, मनुष्यबळ इतर मुलभूत सुविधा पुरविणार आहेत आणि मटकृषी त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री पुरवून तयार मालाची विक्री करणार आहे. संशोधन संचालक डॉ. संजय भावे यांच्या कल्पनेतील विद्यापीठाचा पहिला सार्वजनीक खासगी भागीदारी प्रकल्प आहे.