
गोवंडी परिसरात ‘एअर फिल्टर’ची मागणी
गोवंडी परिसरात ‘एअर फिल्टर’ची मागणी
मुंबई ता. १० : शहरातील हवेची गुणवत्ता ही दिवसेंदिवस वाईट स्थितीत असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. मुंबईतील प्रदूषणाचा भार सोसणाऱ्या गोवंडीवासीयांनीही परिसरात हवेची गुणवत्ता तपासणारी उपकरणे बसवावीत, अशी मागणी केली आहे. सध्या गोवंडीवासीयांना डम्पिंग ग्राऊंड आणि बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांटमुळे मोठ्या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच आरोग्यावर परिणाम करणाऱ्या हवेचा स्तर नेमका कसा आहे, याची माहिती मिळावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
हवेची गुणवत्ता मॉनिटरिंग करणारी दोन उपकरणे गोवंडी पश्चिमेला बसवण्यात आली आहेत. एक उपकरण हे मानखुर्द परिसरातही आहे; पण गोवंडी पूर्वमध्ये एकही उपकरण हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी बसवण्यात आलेले नाही. त्यामुळेच ही उपकरणे संपूर्ण भागातील प्रदूषण मॉनिटरिंगसाठी लावण्यात यावी, अशी मागणी गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक फयाज शेख यांनी केली आहे.
--
कोट
नजीकच्या डम्पिंग ग्राऊंड आणि बायोमेडिकल वेस्ट प्लांटचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना श्वसनाचे त्रास होत आहेत. त्यामुळेच अनेक कुटुंबांनी घरीच एअर क्वालिटी फिल्टर वापरायला सुरुवात केली आहे. सरकारी पातळीवरही हवेची गुणवत्ता तपासणारी उपकरणे असावीत, जेणेकरून स्थानिकांना डेटा उपलब्ध होऊ शकेल.
- फयाज शेख, संस्थापक, गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटी